आॅनलाईन सेवा देण्याच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक करणा-यास कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:42 AM2017-10-20T00:42:33+5:302017-10-20T00:42:33+5:30

६९ लोकांची जवळपास वीस लाख रुपयांची फसवणूक करणारा शेखर ओंकारप्रसाद पोतदार (३२, नागपूर) याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर.आर. मावतवाल यांनी २७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

In the name of giving an online service, 20 lakh fraud cheating | आॅनलाईन सेवा देण्याच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक करणा-यास कोठडी

आॅनलाईन सेवा देण्याच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक करणा-यास कोठडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महा ई-सेवा या संकेतस्थळाशी मिळते जुळते संकेतस्थळ तयार करून या केंद्राची पोर्टल सेवा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली देशातील विविध राज्यांमधील ६९ लोकांची जवळपास वीस लाख रुपयांची फसवणूक करणारा शेखर ओंकारप्रसाद पोतदार (३२, नागपूर) याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर.आर. मावतवाल यांनी २७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमल यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपी शेखरचा साथीदार हितेश कुंबळे याला दिल्लीतून अटक करावयाची आहे. यासाठी शेखरला दिल्लीला सोबत नेणे जरूरी आहे, असे ते म्हणाले. सखोल तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाने मान्य करुन वरीलप्रमाणे आदेश दिला.

Web Title: In the name of giving an online service, 20 lakh fraud cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.