आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान बुधवारी होणार खेळाडूंसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:02 AM2017-11-20T01:02:54+5:302017-11-20T01:04:23+5:30

गरवारे क्रीडा संकुलातील नवीन रुपडे लाभलेले व हिरवा गालिचा असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान तयार होऊन चार महिने झाले होते; परंतु त्याला मुहूर्त लागेना. तथापि, अखेर याला मुहूर्त लाभला असून गरवारे क्रीडा संकुलातील हे दर्जेदार मैदान उद्या, मनपाच्या क्रीडा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून बुधवारपासून खेळाडूंसाठी खुले राहणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 International Cricket Stadium will be open to players on Wednesday | आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान बुधवारी होणार खेळाडूंसाठी खुले

आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान बुधवारी होणार खेळाडूंसाठी खुले

googlenewsNext
ठळक मुद्देमैदानाची देखरेख ठरणार तारेवरची कसरत मैदानाचा लोकार्पण सोहळा लवकरच

जयंत कुलकर्णी।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलातील नवीन रुपडे लाभलेले व हिरवा गालिचा असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान तयार होऊन चार महिने झाले होते; परंतु त्याला मुहूर्त लागेना. तथापि, अखेर याला मुहूर्त लाभला असून गरवारे क्रीडा संकुलातील हे दर्जेदार मैदान उद्या, मनपाच्या क्रीडा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून बुधवारपासून खेळाडूंसाठी खुले राहणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानाला नवीन रूपडे मिळावे यासाठी याआधीचे मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यानुसार गतवर्षी १३ डिसेंबर रोजी गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानाचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी तयार करणाºया क्युरेटर नदीम मेमन यांच्याकडे सोपविण्यात आली होती. औरंगाबाद येथील एडीसीएची खेळपट्टीदेखील तयार करणाºया नदीम मेमन यांनी अवघ्या चारच महिन्यांतच गरवारे क्रीडा संकुलात हिरवा गालिचा असणारे मैदान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दर्जेदार खेळपट्ट्या उभारल्या. त्यात त्यांनी सामन्यांसाठी मुख्य अशा तीन आणि सरावासाठी चार अशा सात खेळपट्ट्या तयार केल्या. या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी पुण्याहून खास लाल माती आणण्यात आली होती. खडी, वीट, लाल माती आणि पोएटा माती यांचे थर देऊन या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या. मैदान हिरवे राहावे यासाठी ६६ स्प्रिंकलर्सदेखील येथे आहेत. विशेष म्हणजे एमसीएचे सचिव रियाज बागवान यांनी गरवारे क्रीडा संकुलातील नव्याने उभारण्यात आलेल्या क्रिकेट मैदानाला भेट दिली होती. त्यांनी या मैदानाची प्रशंसा केली होती. तसेच या मैदानावर महिलांची १९ पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार होती; परंतु या मैदानाचे उद्घाटनच झाले नव्हते. दरम्यान, दर्जेदार क्रिकेट मैदान उभारणाºया क्युरेटर नदीम मेमन यांचे ७0 टक्के बिल थकित असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

मैदानाची देखरेख ठरणार तारेवरची कसरत
सध्या दिसत असलेले गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेटचे मैदान व खेळपट्ट्या भविष्यातही तितक्याच दर्जेदार ठेवण्यासाठी खºया अर्थाने मनपासाठी तारेवरची कसरत असणार आहे.
दर्जेदार मैदान उभारले असले तरी अद्यापही येथे ड्रेनेज व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाचे पाणी मैदानावर साचण्याची शक्यता जास्त आहे.
गरवारे क्रीडा संकुलावरील आसनव्यवस्थेचीही दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे चित्र आहे.

तरच होतील रणजीचे सामने
दरम्यान मनपातर्फे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे क्युरेटर रमेश बोर्डे आणि माजी रणजीपटू अनंत नेरळकर यांची समिती नेमली होती. या समितीने उभारण्यात आलेले गरवारे संकुतील क्रिकेट मैदान आणि खेळपट्टी दर्जेदार आहे; परंतु ड्रेसिंगरूम, बाथरूम व खेळाडूंसाठी बसण्यासाठी जागेची व्यवस्था सध्या योग्य नाही. यात सुधारणा केल्यास राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा होऊ शकतील, अशी शिफारस करणारा अहवाल मनपाकडे सोपविण्यात आला.

मैदानाचा लोकार्पण सोहळा लवकरच
गरवारे क्रीडा संकुलातील नवे रूपडे लाभलेले क्रिकेटचे मैदान तांत्रिक अडचणींमुळे सुरू झाले नाही; परंतु आता ही अडचण दूर झाली असून उद्या, सोमवारी दुपारपर्यंत याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि हे मैदान मनपाच्या क्रीडा विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. हे मैदान खेळाडूंसाठी बुधवारी खुले राहिल. या मैदानाचा लोकार्पण सोहळा लवकरच खा. चंद्रकांत खैरे, आमदार, मनपातील प्रोटोकॉलनुसार पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत महापौरांच्या अध्यक्षतेखाली लवकरच होईल, अशी प्रतिक्रिया महापौर नंदकुमार घोडेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title:  International Cricket Stadium will be open to players on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.