Improved response to Marathwada bandh; Police detonation at Aurangabad and Nanded | मराठवाड्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; औरंगाबाद व नांदेड येथे पोलिसांवर दगडफेक 
मराठवाड्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; औरंगाबाद व नांदेड येथे पोलिसांवर दगडफेक 

मराठवाडा : भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्त विविध संघटनांनी एकत्रित पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. औरंगाबाद व नांदेडच्या आंबेडकर नगर भागात जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना वगळता सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. दगडफेकीत औरंगाबाद येथे १ तर नांदेड येथे ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले.

सोमवारी भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्त भारिप बह्जून महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विविध संघटनाश घोषित केलेल्या महाराष्ट्र बंदला आज सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांनी ठिकठिकाणी एकत्र येत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मराठवाड्यातील सर्वच ठिकाणी बाजारपेठा उत्स्फूर्तपणे बंद होत्या. यासोबतच सर्व भागातील बस सेवा तसेच खाजगी वाहतूकही बंद होती. मुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. रेल्वे स्थानकावर सुद्धा बंदचा परिणाम दिसून आला.

आंबेडकर नगरात दगडफेक 
औरंगाबाद येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेल्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर तेथे जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात एक पोलीसा कर्मचारी जखमी झाला. तसेच नांदेड येथील आंबडेकर नगरातही जमावाकडून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाली व गाडीचे नुकसान झाले. 


Web Title: Improved response to Marathwada bandh; Police detonation at Aurangabad and Nanded
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.