आपतगावचा अर्धवट पाडलेला जलकुंभ बनला जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 07:46 PM2018-11-22T19:46:20+5:302018-11-22T19:46:40+5:30

चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैदान असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे.

 A half-burnt water pump became a life threatening fire | आपतगावचा अर्धवट पाडलेला जलकुंभ बनला जीवघेणा

आपतगावचा अर्धवट पाडलेला जलकुंभ बनला जीवघेणा

googlenewsNext

चितेपिपळगांव : आपतगाव येथील स्वामी ब्रम्हानंद महाराज मंदिराशेजारी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेला पंचवीस हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ धोकादायक अवस्थेत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वळसा घालून वाहनाधारकांना गावात जावे लागत आहे.तर दुसरीकडे जलकुंभाजवळ मैदान असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे.


एकेकाळी गावाला पाणी पुरवठा करणारा हा अर्धवट पाडण्यात आला. दोन वर्षांपासून याची स्थितीत हा जलकुंभ आहे. जलकुंभ राज्य रास्ता २११ मध्ये येतो. त्यामुळे येथुन पाणी पुरवठा बंद केला आहे. यासाठी पर्यायी जलकुंभ उभारण्यात आला. यातून दोन वर्षांपासून गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. परतु याच रस्त्याचे काम करताना भारत निर्माण योजनेंतर्गत टाकण्यात आलेली पाईप लाईन जागो जागी फुटली. या पाईपलाईनमधून जागोजागी गळती आहे.संबंधित कंत्राटदार कंपनीने ही गळती अद्याप थांबविली नाही. त्यामुळे संपूर्ण गावाला समान पाणी पुरवठा होत नसल्याचे भगवान पाटील चौधरी यांनी सांगितले.

या रस्त्याचे काम आयआरबी कंपनी करत आहे. हा जलकुंभ पाडण्यासाठी दोन दिवसांपासून मातीचा ढिगार तयार केला. बुलोडजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धवट स्थितीत ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गावात जाण्यासाठी हा जलकुंभ अडथळा ठरत आहे. पर्याय म्हणून पुलाखालून जाण्यासाठी रस्ता आहे. परतु वळसा घालून जावे लागते. शिवाय बाजूलाच मैदान आहे. सकाळी व संध्याकाळी येथे मुले व्हॉली बॉल खेळण्यासाठी येतात.

यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या रास्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे टाकी जमीनदोस्त होऊ शकलेली नाही. उद्या एखादी दुर्घटना घडली तर कंपनीवे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब भोसले पाटील दिला आहे. पर्याय म्हणून दुसरी पाण्याची टाकी वेळेत बांधली. तसेच भारत निर्माण योजनेंर्तगत केलेली पाईपलाईन या रस्त्याच्या कामात तुटली. याची दुरुस्ती अद्याप करुन देण्यात आलेली नाही. ती तात्त्काळ जोडून देण्याची मागणी भगवान चौधरी पाटील यांनी केली आहे.

Web Title:  A half-burnt water pump became a life threatening fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.