उद्योगांनी पाण्याच्या पुनर्वापरावर भर द्यावा- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:11 AM2018-04-22T01:11:27+5:302018-04-22T01:11:34+5:30

धरणांतील पाणी शेती, पिण्यासाठी

Focus on recycling of water by industry: Devendra Fadnavis | उद्योगांनी पाण्याच्या पुनर्वापरावर भर द्यावा- देवेंद्र फडणवीस

उद्योगांनी पाण्याच्या पुनर्वापरावर भर द्यावा- देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

औरंगाबाद : उद्योगांनी प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा वापरावे, प्रक्रिया केलेले पाणी कमी पडले तर ताजे पाणी वापरता येईल. यापुढे उद्योगांनी पाण्याच्या पुनर्वापरावर भर द्यावा. धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी वापरले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी औरंगाबादेत सांगितले.
शेंद्रा-बिडकीन या डीएमआयसी प्रकल्पातील आॅरिक टप्पा क्रमांक-२ चे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. गेल्या महिन्यात वैजापूर येथे धरणातील पाणी उद्योगांना देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे उद्योजकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, उद्योगांना पाणी देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, पाण्याच्या पुनर्वापरासाठी नागपूरला मॉडेल तयार केले. नवी मुंबईतही प्रक्रिया केलेले पाणी वापरले जाते. प्रक्रिया केलेले पाणी उद्योगांनी वापरल्यामुळे एमआयडीसी व मनपालादेखील त्याचा फायदा होतो आहे. उद्योगांकडून वाचलेले पाणी शेती व पिण्यासाठी देता येते. एमएमआरडीएला पाणी कमी पडते आहे. तेथील पाणी उद्योगांना दिले तर त्या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. नवी मुंबईत पाण्याचा पुनर्वापर होतो आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय उद्योगमंत्री तथा नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदींची उपस्थिती होती.

कचऱ्यावरून राजकारण
औरंगाबाद मनपाला रस्त्यासाठी आम्ही सर्वाधिक निधी दिला. कचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला एक पैसा न मागता निधी देण्यास सुरुवात केली आहे. असे असताना काही लोक त्यामध्ये आरोप-प्रत्यारोप करीत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सांगितले.


 

Web Title: Focus on recycling of water by industry: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.