शेंद्रा येथील मांगीरबाबा मंदिराची दानपेटी पळवली; गावाबाहेर मिळाले अवशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 12:20 PM2017-11-22T12:20:33+5:302017-11-22T12:23:05+5:30

शेंद्रा गावात असलेले प्रसिद्ध मांगीरबाबा मंदिराची  दानपेटी पळवून नेऊन फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आले. फोडलेली दानपेटी गावाच्या बाहेर दूरवर आढळून आली.

donation box of Mangir Baba Temple in Shandra found broken out of the village | शेंद्रा येथील मांगीरबाबा मंदिराची दानपेटी पळवली; गावाबाहेर मिळाले अवशेष

शेंद्रा येथील मांगीरबाबा मंदिराची दानपेटी पळवली; गावाबाहेर मिळाले अवशेष

googlenewsNext
ठळक मुद्देकाल मध्यरात्री २.३० च्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला.. मंदिरात सीसीटीव्ही असल्याने चोरट्यांनी प्रथम मंदिरातील लाईट फोडली.

औरंगाबाद : शेंद्रा गावात असलेले प्रसिद्ध मांगीरबाबा मंदिराची  दानपेटी पळवून नेऊन फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आले. फोडलेली दानपेटी गावाच्या बाहेर दूरवर आढळून आली. याबाबत चिकलठाणा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

घटनेबद्दल मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मांगीरबाबा मंदिरात काल मध्यरात्री २.३० च्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. मंदिरात सीसीटीव्ही असल्याने चोरट्यांनी प्रथम मंदिरातील लाईट फोडली. यानंतर त्यांनी मंदिरातील दानपेटी पळवली. सकाळी गावाच्या बाहेर फोडलेल्या दानपेटीचे अवशेष आढळून आले. घटनेची माहिती मिळताच चिखलठाणा पोलीस पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंदिराच्या पुजा-याच्या म्हणण्यानुसार दानपेटीत दानात आलेली अधिक रक्कम नसावी. सीसीटीव्ही मध्ये दानपेटी फोडून नेतानाची दृश्य दिसून येत आहे. मात्र, मंदिरात लाईट नसल्याने ती दृश्य अधिक स्पष्ट नाहीत.

यासोबतच गावातील मारोती मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे सकाळी उघड झाले आहे. या दोन्ही घटनेचा तपास चिखलठाणा पोलीस करत आहेत. 

Web Title: donation box of Mangir Baba Temple in Shandra found broken out of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.