जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेतर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी मोफत जलतरण शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:41 AM2018-03-17T00:41:40+5:302018-03-17T00:42:01+5:30

जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेतर्फे १८ मार्चपासून दिव्यांग खेळाडूंसाठी मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर स्टेशन रोडवरील टिस येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन रविवारी सकाळी ८ वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते होणार आहे.

 District Paralympic Association offers Free Swimming Camp for Divine Players | जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेतर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी मोफत जलतरण शिबीर

जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेतर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी मोफत जलतरण शिबीर

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेतर्फे १८ मार्चपासून दिव्यांग खेळाडूंसाठी मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर स्टेशन रोडवरील टिस येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन रविवारी सकाळी ८ वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी गजानन बारवाल, विकास जैन, त्र्यंबक तुपे, शिबा प्रसाद, डॉ. प्रदीप खांड्रे, निसार खान उपस्थित राहणार आहेत. या शिबिराला एनआयएस प्रशिक्षक मदन बाशा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिरातील खेळाडूंना वर्षभर क्रीडा साहित्य, आहार व तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य पॅरालिम्पिक जलतरण संघटनेचे सचिव अभय देशमुख यांनी कळवले आहे.
या प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आहे.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. पवन डोंगरे, अभय देशमुख, अ‍ॅड. मीरा बाशा, डॉ. संदीप जगताप, प्रवीण कटारिया, राजेश पाटील, रुस्तम तुपे, रवींद्र राठी आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title:  District Paralympic Association offers Free Swimming Camp for Divine Players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.