दिनेश परदेशी भाजपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:41 AM2018-03-19T00:41:53+5:302018-03-19T00:42:36+5:30

शहरातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूर्णविराम मिळाला. विशेष म्हणजे वैजापूर न.प. निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 Dinesh in foreign BJP | दिनेश परदेशी भाजपमध्ये

दिनेश परदेशी भाजपमध्ये

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : शहरातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूर्णविराम मिळाला. विशेष म्हणजे वैजापूर न.प. निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबादमधील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी खा. दानवे यांच्यासह डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर, युवक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय माजी नगराध्यक्ष राजूसिंह राजपूत, राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी, माजी नगरसेवक सुलतान कुरेशी, माजी नगरसेवक हिकमत काका, महंमद नूर कुरेशी, विजय व्यवहारे, फेरोज पठाण, शिवसेनचे माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे हमीद कुरेशी, शिवसेनेचे शैलेश चव्हाण, काँग्रेसचे युवराज चेळेकर, माजी नगरसेवक दशरथ बनकर, जाकीर कुरेशी, चेअरमन राजेश संचेती, मर्चंट बँकेचे संचालक मनोज छाजेड, नितीन सोमाणी, सावनसिंग राजपूत, युवक काँग्रेसचे शहरप्रमुख वाजेद कुरेशी, नासेर चाऊस, शकील पठाण, राज मोहंमद शेख यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश घेतला.
वैजापूर शहरात रॅली काढून जल्लोष
प्रवेश सोहळा झाल्यावर भाजपच्या वतीने वैजापूर शहरात रॅली काढून जल्लोष करण्यात आला. तालुक्यात २००२ पासून काँग्रेसच्या राजकारणात डॉ. दिनेश परदेशी यांची भूमिका मोठीच होती. मात्र, न.प. निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींनी वेग घेतला. आठ दिवसांपासून डॉ. परदेशी मुंबईत असल्याने तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आले होते. काँग्रेस नेत्यांनीही डॉ. परदेशी यांना रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. वैजापूर नगर परिषदेची निवडणूक येत्या ६ एप्रिल रोजी होणार आहे. परदेशी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष सोडल्याने याचे पडसाद निवडणुकीत उमटणार आहेत. आतापर्यंत सर्व निवडणुकांचे सेनापती म्हणून परदेशी यांनीच वैजापूर नगरपालिकेची कमान सांभाळली आहे.

Web Title:  Dinesh in foreign BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.