आधारभूत किमतीचे शेतक-यांना गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:25 AM2018-01-24T00:25:30+5:302018-01-24T00:25:39+5:30

केंद्र सरकारने तुरीची आधारभूत किंमत ५४५० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे; मात्र महिना उलटूनही शासनाची तूर खरेदी बंदच असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा १५०० रुपये कमी भावात तूर खरेदी करीत आहेत. याचा आर्थिक फटका शेतक-यांनाच बसत आहे. तुरीसह मूग, मका, उडीद, सोयाबीन, बाजरी या पिकांनाही आधारभूत किंमत मिळाली नाही. आधारभूत किंमत हे शेतक-यांसाठी केवळ स्वप्न राहिले आहे.

Carrots to farmers of basic cost | आधारभूत किमतीचे शेतक-यांना गाजर

आधारभूत किमतीचे शेतक-यांना गाजर

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाची तूर खरेदी बंदच : फक्त आॅनलाईन नोंदणी; क्विंटलमागे १५०० रुपयांचा शेतक-यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्र सरकारने तुरीची आधारभूत किंमत ५४५० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे; मात्र महिना उलटूनही शासनाची तूर खरेदी बंदच असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा १५०० रुपये कमी भावात तूर खरेदी करीत आहेत. याचा आर्थिक फटका शेतक-यांनाच बसत आहे. तुरीसह मूग, मका, उडीद, सोयाबीन, बाजरी या पिकांनाही आधारभूत किंमत मिळाली नाही. आधारभूत किंमत हे शेतक-यांसाठी केवळ स्वप्न राहिले आहे.
कमिशन फॉर अ‍ॅग्रिकल्चरल कॉस्ट अ‍ॅण्ड प्राईस (सीएसीपी)ने केलेल्या शिफारशीच्या आधारावर किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात येत असते.
उत्पादनाचा खर्च, एकूण मागणी, देशांतर्गत पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय दर, यासह इतर बाबी लक्षात घेऊन त्या आधारे आधारभूत किमतीची शिफारस करण्यात येते. सीएसीपीचे यंत्रणा तज्ज्ञ असल्याने त्यांच्या शिफारशी सर्वसाधारणपणे जशाच्या तशा स्वीकारल्या जातात. यंदा डाळी आणि तेलबियांची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता आधारभूत किमतीत आणखी बोनसही जाहीर करण्यात आला आहे. २०१७-२०१८ साठी आधारभूत किमती पुढीलप्रमाणे मका-१४२५ रुपये, बाजरी-१४२५ रुपये, तूर- ५४५० रुपये, मूग- ५५७५ रुपये, उडीद- ५४०० रुपये, तर सोयाबीन- ३०५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. यापेक्षा जास्त भावात व्यापाºयांनी खरेदी करणे अपेक्षित आहे. जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात व्यापारी खरेदी करीत असतील, तर अशा वेळी सरकारने हस्तक्षेप करीत आधारभूत खरेदी केंद्र सुरू करणे अपेक्षित असते; मात्र मागील ६ महिन्यांचा विचार केला, तर शेतकºयांसाठी आधारभूत किंमत ‘स्वप्नच’ ठरले आहे. कारण, बाजार समितीत हर्राशीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा हजार ते दीड हजार रुपयांनी कमीच भाव त्यांना मिळाला आहे. सध्या जाधववाडी कृउबामध्ये व्यापारी ३९०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलने तूर खरेदी करीत आहेत. मंदीचे कारण, अन्य राज्यांत तुरीचे उत्पादन बंपर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे बाजार समितीत शासनाचे तूर खरेदी केंद्र उघडले आहे, पण खरेदीचे आदेश अजून आले नाहीत. तेथील दोन कर्मचारी शेतकºयांची फक्त आॅनलाईन नोंदणी करून घेत आहेत. आजपर्यंत १६७ शेतकºयांनीच आॅनलाईन नोंदणी केली आहे.
मुळात बाजारात तूर डाळ ५७०० ते ५८०० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. तुरीचा हमीभाव ५४५० रुपये आहे. मागील वर्षी ६५ लाख क्विंटल तूर सरकारने खरेदी केली. त्याचा साठा बंपर आहे. अशा कात्रीत सरकार अडकले आहे. नुसते तुरीलाच हमीभाव मिळत नाही, असे नाही, तर बाजरी १०५० ते १४०० रुपये, नोव्हेंबरमध्ये मका ९०० ते १२०० रुपये विकला. आता १००० ते ११०० रुपये, तर मूग ४००० ते ४५०० रुपये क्विंटल या भावात बाजार समितीत विक्री झाला. हमीभावापेक्षा ४०० ते १ हजार रुपये कमी भाव शेतकºयांना मिळत आहे.
खर्च ६ हजार, मिळाले ६३०० रुपये
एका एकरामध्ये ३ गोणी तुरीचे उत्पादन झाले. दीड क्विंटल तूर हातात आली. शेतात तूर लावण्यापासून ते कृउबात आणेपर्यंत ६ हजार रुपये खर्च आला. आज हर्राशी झाली व ६३०० हजार रुपये मिळाले. आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू असते, तर दीड क्विंटलचे ८१७५ रुपये तरी हातात मिळाले असते. केंद्र सुरू नसल्याने १८७५ रुपयांचे नुकसान झाले.
प्रल्हाद पवार, तूर उत्पादक (पिंप्रीराजा)

Web Title: Carrots to farmers of basic cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.