केम्ब्रिज, सेंट लॉरेन्स, एस.बी.ए. संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:36 AM2018-03-17T00:36:40+5:302018-03-17T00:37:03+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी केम्ब्रिजने पर्ल्स अकॅडमीचा, सेंट लॉरेन्सने न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूलचा, टेंडर केअर होम संघाने सेंट झेव्हिअर्स संघाचा आणि पीएसबीएने रिव्हरडेल संघाचा पराभव केला. आज झालेल्या समन्यात सिमर राजपाल, विशाल धुमाळ, शिवम काळे आणि किरण खंबायत यांनी सामनावीर किताबाचा मान मिळवला.

 Cambridge, St. Lawrence, S.B.A. Team won | केम्ब्रिज, सेंट लॉरेन्स, एस.बी.ए. संघ विजयी

केम्ब्रिज, सेंट लॉरेन्स, एस.बी.ए. संघ विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देआंतरशालेय क्रिकेट स्पर्धा : सिमर राजपालचे ३ धावांत ४ बळी

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी केम्ब्रिजने पर्ल्स अकॅडमीचा, सेंट लॉरेन्सने न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूलचा, टेंडर केअर होम संघाने सेंट झेव्हिअर्स संघाचा आणि पीएसबीएने रिव्हरडेल संघाचा पराभव केला. आज झालेल्या समन्यात सिमर राजपाल, विशाल धुमाळ, शिवम काळे आणि किरण खंबायत यांनी सामनावीर किताबाचा मान मिळवला.
सकाळच्या सत्रातील पहिल्या लढतीत सेंट लॉरेन्सने प्रथम फलंदाजी करताना १0 षटकांत ४ बाद ९३ धावा केल्या. त्यांच्याकडून आयुषसिंगने १५ चेंडूंत ४ चौकारांसह २५, विशाल धुमाळने ९ चेंडूंत ४ चौकारांसह १९ आणि पी. वाघ याने १७ धावांचे योगदान दिले. न्यू बिगिनिंग इंटरनॅशनलकडून सागर मुके याने १0 धावांत २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूलचा संघ ८.२ षटकांत ४९ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून जीवन येवले याने १४ धावा केल्या. सेंट लॉरेन्सकडून विशाल धुमाळने ९ धावांत ४ गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात सिमर राजपाल आणि रौनक डोडिया यांच्या भेदक माºयासमोर केम्ब्रिजने पर्ल्स अकॅडमीला ५.४ षटकांत अवघ्या १४ धावांत गुंडाळले. केम्ब्रिजकडून सिमर राजपाल याने ३ धावांत ४ गडी बाद केले. त्याला रौनक डोडिया याने ५ धावांत ३ गडी बाद करीत साथ दिली. केम्ब्रिजने विजयी लक्ष्य ५ चेंडूंत पूर्ण केले. त्यांच्याकडून संकेत पाटीलने नाबाद १0 धावा केल्या.
तिसºया सामन्यात टेंडर केअर होम संघाविरुद्ध सेंट झेव्हिअर्सने प्रथम फलंदाजी करीत १0 षटकांत ६ बाद ६५ धावा केल्या. त्यांच्याकडून एस. राठोडने १९ व चंद्रशेखर शिंदेने १0 धावा केल्या. टेंडर केअर होमकडून शिवम काळेने ११ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात टेंडर केअर होम संघाने ८.४ षटकांत ८ फलंदाज गमावून विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून शुभम रामपुरेने सर्वाधिक १४ धावा केल्या. सेंट झेव्हिअर्सकडून ऋषिकेश डी., विनय अहिरे व आर. पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. विशेष म्हणजे सेंट झेव्हिअर्सने २४ धावा अवांतर देत त्यांच्या संघावर पराभवाची नामुष्की ओढवून घेतली.
दुसºया सामन्यात गुडईअरविरुद्ध आयजीटीआरने २० षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. त्यांच्याकडून ऋषिकेश तरडे याने ५९ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५९ धावा केल्या. गौरव शिंदेने ४३ चेंडूंत ६ चौकारांसह ४६ धावांचे योगदान दिले. गुडईअरकडून कमलेश कालवावे याने २७ धावांत २ गडी बाद केले. प्रदीप यादव व अजित महालिंगा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात गुडईअरने विजयी लक्ष्य १७.२ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून जालिंदर हिवराळेने ३१ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३८ धावा केल्या. प्रदीप यादवने २१ व असिफ खानने १९ धावांचे योगदान दिले. आयजीटीआरकडून महेश वझे व ऋषिकेश तरडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे १६ व २२ धावा मोजल्या.
तिसºया सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांत सर्वबाद ११६ धावा केल्या. त्यांच्याकडून सौरभ लड्डा याने ५२ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. विनोद शाहूराजेने ३ चौकारांसह १८ धावांचे योगदान दिले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नीरज देशपांडेने ९ धावांत ४ गडी बाद केले. मनोज घोडेके व रवींद्र तोंडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे १८ व १९ धावा मोजल्या. प्रत्युत्तरात सार्वजनिक बांधकाम विभागाने विजयी लक्ष्य १५.३ षटकांत पूर्ण केले. त्यांच्याकडून योगीराज चव्हाण याने चौफेर टोलेबाजी करीत २२ चेंडूंतच ३ चौकार व ३ टोलेजंग षटकारांसह ४० धावांची स्फोटक खेळी केली. अजिंक्य दाभाडे, रवींद्र तोंडे, मनोज घोडके आणि योगेश राठी यांनी प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले. वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाकडून आनंद वाडशेलारने २६ धावांत ३ गडी बाद केले. विनोद शाहूराजे, महेश जाधव आणि सौरभ लड्डा यंनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आज झालेल्या सामन्यात पंच म्हणून विष्णू बब्बीरवार, गंगाधर शेवाळे, महेश सावंत, उदय बक्षी यांनी काम पाहिले. गुणलेखन राजेश भिंगारे व अजित कुमार यांनी केले.

Web Title:  Cambridge, St. Lawrence, S.B.A. Team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.