ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:33 AM2017-08-28T00:33:47+5:302017-08-28T00:33:47+5:30

मद्य पिऊन भरधाव वाहन चालविणाºयांची तपासणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन उपलब्ध करू न देण्यात आल्या आहेत. मात्र, शहर व जिल्ह्यात ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे वाहनधारकांची कुठलीही तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

Breath annuler machine dust | ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन धूळखात

ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन धूळखात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मद्य पिऊन भरधाव वाहन चालविणाºयांची तपासणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन उपलब्ध करू न देण्यात आल्या आहेत. मात्र, शहर व जिल्ह्यात ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे वाहनधारकांची कुठलीही तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
मद्य पिऊन भरधाव वाहन चालविण्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, त्यात अनेकांनी जीव गमावला आहे. अशा घटनांना आळा बसावा याकरिता जालना पोलिसांना मुंबई, पुणे शहरातील पोलिसांप्रमाणेच ५० हून अधिक ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहर वाहतूक शाखेसह प्रत्येक पोलीस ठाण्यास या मशीनचे वाटप करण्यात आले असून, मद्य पिऊन वाहन चालविणाºयांची तपासणी करण्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्या आहेत. असे असले तरी जालन्यातील कुठल्याच नाकाबंदी दरम्यान या मशीनचा वापर केला जात नाही. रात्रीच्या वेळी शहरातून अनेक दुचाकीस्वार मद्य पिऊन भरधाव गाडी चालवत असल्याचे पाहावयास मिळते.
विशेषत: मंठा चौफुली, अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली या भागात मद्यपी वाहनचालकांचे नेहमी आढळून येतात. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन वादही होतात. पोलीस प्रशासनाने ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे नियमित तपासणी सुरू केल्यास मद्यपी वाहनधारकांवर वचक बसेल.

Web Title: Breath annuler machine dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.