बंजारा समाजाचा आक्रोश मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:44 AM2017-08-19T00:44:24+5:302017-08-19T00:44:24+5:30

हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृती समितीने बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला.

 Banjara community's indignation silent front | बंजारा समाजाचा आक्रोश मूक मोर्चा

बंजारा समाजाचा आक्रोश मूक मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृती समितीने बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला. तो भव्यदिव्य ठरला, लक्ष वेधून घेणारा ठरला. या मोर्चाने बंजारा समाजाची जणू ताकदच दाखवून दिली. मोर्चात बंजारा तरुण- तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. विधानपरिषदेचे सदस्यद्वय प्रा.जोगेंद्र कवाडे व हरिभाऊ राठोड हे मोर्चात पायी चालले. सीमा राठोडचे आई- वडीलही या मोर्चात सहभागी झाले होते. पण कृती समितीच्या निर्णयानुसार तीन मुलींव्यतिरिक्त मोर्चाच्या समारोपस्थळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या सभेत अन्य कुणीही बोलले नाही. विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन या मुलींनीच दिले.
सकाळपासून औरंगाबादचा क्रांतीचौक बंजारा स्त्री- पुरुषांनी फुलत होता. तांड्यातांड्यातून बंजारा बंधू-भगिनी येतच राहिल्या. सकाळी ११ वाजता निघणारा हा मोर्चा दुपारी १ च्या सुमारास क्रांतीचौकातून मार्गक्रमण करू लागला. दोन दोनच्या रांगेत शिस्तीत हा मोर्चा सुरू झाला. मोर्चाच्या अग्रभागी भलेमोठे बॅनर धरून पारंपरिक वेशभूषेतील बंजारा महिला चालत होत्या. त्यापाठोपाठ बंजारा तरुणी चालत होत्या. नंतर मोठ्या संख्येने सहभागी झालेला बंजारा तरुण वर्ग होता. जवळपास प्रत्येकाच्याच हातात ‘ जय सेवालाल’चे झेंडे होते आणि बहुतेकांच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते. अनेक स्त्री- पुरुषांच्या डोक्यावर टोप्या होत्या आणि त्यावर ‘सीमा राठोडच्या मारेकºयांना फाशी द्या’ असे लिहिलेले होते.
यापुढे सीमा राठोड घडणार नाही
मूक मोर्चा असल्यामुळे कुणीही घोषणाबाजी केली नाही. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा दुपारी अडीचच्या सुमारास विभागीय आयुक्तालयावर धडकला. तेथील भव्य पटांगणात मोर्चेकरी बसून गेले. तेथे झालेल्या सभेत रविना राठोड, वृंदा पवार व भारती राठोड या तीन मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तिघींनीही जय सेवालाल म्हणत आपल्या भाषणाचा शेवट केला. रविना राठोड म्हणाली, सीमा राठोडसारखी वेळ कुणावरही येऊ नये.
महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले जाते, असे सांगितले जाते, पण स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा तरी अधिकार आहे काय? हा खरा प्रश्न आहे. दररोज स्त्रियांवर अन्याय- अत्याचार होतच आहेत. पण यापुढे तरी सीमा राठोड घडणार नाही, याची काळजी आता सर्वांनी घेतली पाहिजे.
न्यायालयीन चौकशी करा -कवाडे
सभास्थळीच आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, विधानपरिषदेत मी आणि हरिभाऊ राठोड यांनी सीमा राठोड हत्या प्रकरण उचलले होते. कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अद्याप साधे चार्जशीटसुद्धा दाखल झालेले नाही. या अन्याय- अत्याचार सहज घेतले जातात, असा आरोपही प्रा. कवाडे यांनी यावेळी केला. गरिबांच्या लेकीबाळी म्हणजे भाजीपाला आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.
या मोर्चात ध्वनिक्षेपकावरून राजपालसिंग राठोड हे बंजारा भाषेतच सूचना देत होते. मागणीपत्रावर डॉ. कृष्णा राठोड, राजेंद्र प्रल्हाद राठोड, अनिल चव्हाण, गोरखनाथ राठोड, रमेश पवार, पी. एम. पवार, नीलेश चव्हाण, सुनील चव्हाण, शरयू राठोड, कलाबाई राठोड, (पान ५ वर)

Web Title:  Banjara community's indignation silent front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.