औरंगाबादचे नितीन घोरपडे २४ तास स्टेडियम स्पर्धेत चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:15 AM2018-06-29T01:15:45+5:302018-06-29T01:16:14+5:30

औरंगाबाद येथील धावपटू नितीन घोरपडे यांनी मुंबई विद्यापीठ येथे नुकत्याच झालेल्या २४ तास स्टेडियम स्पर्धेत विशेष ठसा उमटवला. दमट हवामान, जोरदार पाऊस व घामटा काढणारे वातावरण या प्रतिकूल परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाताना नितीन घोरपडे यांनी या स्पर्धेत ४00 मीटर ट्रॅकवर ११५.६ कि. मी. अंतर धावताना २८९ फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या.

Aurangabad's Nitin Ghorpade shines in the 24-hour stadium tournament | औरंगाबादचे नितीन घोरपडे २४ तास स्टेडियम स्पर्धेत चमकले

औरंगाबादचे नितीन घोरपडे २४ तास स्टेडियम स्पर्धेत चमकले

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद येथील धावपटू नितीन घोरपडे यांनी मुंबई विद्यापीठ येथे नुकत्याच झालेल्या २४ तास स्टेडियम स्पर्धेत विशेष ठसा उमटवला. दमट हवामान, जोरदार पाऊस व घामटा काढणारे वातावरण या प्रतिकूल परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाताना नितीन घोरपडे यांनी या स्पर्धेत ४00 मीटर ट्रॅकवर ११५.६ कि. मी. अंतर धावताना २८९ फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या.
औरंगाबादच्या महिला धावपटू माधुरी निमजे यांनीदेखील या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यांनी ६६ कि.मी. अंतर व १६५ फेºया तसेच अजित घुले यांनी ७६.४ कि.मी. व १९१ फेºया एवढे अंतर यशस्वीपणे पूर्ण करून १२ तासांची ही स्पर्धा पूर्ण केली.
नितीन घोरपडे हे चांगले सायकलपटूदेखील आहेत. त्यांनी याआधी २00, ३00, ४00 आणि ६00 कि.मी. सायकल चालवली आहे. त्याचप्रमाणे धावपटू म्हणून त्यांनी १५.३९ तास १00 कि. मी. सलग धावणे, ३२ तास २९ मिनिटे वेळेत भर उन्हाळ्यात नाशिक ते ठाणे येथील १६१ कि. मी. अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीपासून ११८00 मीटर उंच असणाºया खांर्दुंगला येथे ७२ कि. मी. धावणे तसेच लडाख अल्ट्रा मॅरेथॉनही यशस्वीपणे पूर्ण केली आहे. नितीन घोरपडे यांनी चेन्नई ट्रायथलॉनही गाजवली आहे. या स्पर्धेत त्यांनी ३.९ कि.मी. जलतरण, १८0 कि.मी. सायकलिंग आणि ४२ कि. मी. धावणे हे तिन्ही क्रीडा प्रकार १८ तास आणि ८ मिनिटांत पूर्ण केले आहे. तसेच २१ कि. मी.च्या २९ अर्धमॅरेथॉन, ४२ कि.मी.च्या ५ पूर्ण मॅरेथॉन, ५0 कि. मी.च्या ३ अल्ट्रा मॅरेथॉन व ७५ कि.मी.च्या २ अल्ट्रा मॅरेथॉनही यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यांनी योग शिक्षकाचा डिप्लोमाही उत्तीर्ण केला आहे.

Web Title: Aurangabad's Nitin Ghorpade shines in the 24-hour stadium tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :