औरंगाबादेत ९० कोटींचा प्रकल्प; अनेकांचे ‘इंटरेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:57 PM2018-06-07T23:57:23+5:302018-06-07T23:58:59+5:30

राज्य शासन, महापालिका, घनकचरा संनियंत्रण समितीच्या फेºयात शहरातील कचरा समस्या १११ दिवसांपासून तशीच असून, कचरा प्रक्रियेसाठी राबविण्यात येणाºया ९० कोटींच्या प्रकल्पात अनेकांचे इंटरेस्ट वाढले आहेत.

Aurangabad has a project worth Rs 90 crore; Many 'Interest' | औरंगाबादेत ९० कोटींचा प्रकल्प; अनेकांचे ‘इंटरेस्ट’

औरंगाबादेत ९० कोटींचा प्रकल्प; अनेकांचे ‘इंटरेस्ट’

googlenewsNext
ठळक मुद्देआता रोगराईची भीती : राज्य शासन, महापालिका, संनियंत्रण समितीच्या फेऱ्यात गेले १११ दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य शासन, महापालिका, घनकचरा संनियंत्रण समितीच्या फेºयात शहरातील कचरा समस्या १११ दिवसांपासून तशीच असून, कचरा प्रक्रियेसाठी राबविण्यात येणाºया ९० कोटींच्या प्रकल्पात अनेकांचे इंटरेस्ट वाढले आहेत. पावसाळा सुरू झाला असून, कच-यांच्या ढिगांमुळे रोगराईची भीती वाढू लागली असून, पालिका, संनियंत्रण समिती सध्या ढीम्मपणे निर्णय घेत असल्याचे दिसते.
कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी इंदौरची संस्था पीएमसी म्हणून काम पाहणार आहे. त्यांची टीम पुण्याहून काम पाहते. राज्य शासनाच्या नगरविकास विभाग क्रमांक १ व २ च्या सचिवांमार्फत आयुक्तालयात कार्यशाळा व बैठका सुरू आहेत. या सगळ्या चक्रव्यूहात शहरातील कचरा टाकण्यासाठी निश्चित केलेल्या जागांचे काय करायचे, प्रक्रिया प्रकल्पाचे काय झाले. या व इतर अनेक बाबींचे मुद्दे मागे पडले आहेत. पावसाळा सुरू झाला आहे. शहरातील कचºयाचे ढीग रोगराईला आमंत्रण देऊ लागले आहेत.
१६ फेब्रुवारी ते ७ जूनपर्यंतचा कचºयाच्या समस्येचा प्रवास ‘शहराचा कचरा’ करणारा ठरला आहे. या १११ दिवसांत शहरातील इतर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी शासनापासून पालिकेपर्यंत कुणालाही वेळ मिळालेला नाही. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांना कचरा संनियंत्रण समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यांनी आजवर २० च्या आसपास बैठका घेतल्या; परंतु आऊटपुट काहीही मिळालेले नाही.
इंदौरमधून प्रकल्पाचा डीपीआर करणारी संस्था काम पाहत आहे. त्या संस्थेचे कार्यालय पुण्याला आहे. शासनाचे प्रतिनिधी संनियंत्रण समितीकडे येऊन बैठका, कार्यशाळा घेऊन प्रक्रिया प्रकल्पाची माहिती जाणून घेत आहेत. या सगळ्या प्रक्रि येत महापालिकेला कुठलाही थांगपत्ता नाही. परिणामी कुठे काय चालले आहे, हे कळण्यास मार्ग नसून, शहरातील कचरा समस्या सुटत नसल्याचे दिसते आहे.
मनपा सत्ताधाºयांचा दावा असा
४शनिवारी कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदा अंतिम होतील. ९० कोटी रुपयांतून खरेदी करण्यात येणारी यंत्रणा कशी असावी, याची पारदर्शक माहिती प्रशासनाने सादर करावी, असे सूचित करण्यात आले आहे, असा दावा सभापती राजू वैद्य यांनी केला. कचºयामुळे शहराची प्रतिमा मलिन झाली आहे; परंतु स्वच्छ व सुंदर शहर करण्याला प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.

Web Title: Aurangabad has a project worth Rs 90 crore; Many 'Interest'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.