राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत औरंगाबादला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:55 PM2017-11-18T23:55:46+5:302017-11-18T23:57:46+5:30

औरंगाबाद : सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत औरंगाबाद विभागाने १४ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. मुलींच्याही संघाने जबरदस्त ...

Aurangabad Gold in the State Badminton Championship | राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत औरंगाबादला सुवर्ण

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत औरंगाबादला सुवर्ण

googlenewsNext
ठळक मुद्दे१४ वर्षांखालील गट : मुलींच्या गटात कास्यपदक

औरंगाबाद : सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत औरंगाबाद विभागाने १४ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. मुलींच्याही संघाने जबरदस्त कामगिरी करताना १४ वर्षांखालील वयोगटात कास्यपदक पटकावले.
मुलांच्या गटात औरंगाबाद विभागाने उपांत्य फेरीत नागपूर संघाचा २-१ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. औरंगाबादच्या प्रथमेश कुलकर्णी व सुधांशू शिंदे या जोडीने सार्थक व अद्वैत मिस्त्री या जोडीवर १५-२१, २१-१७, २१-१९ अशा फरकाने मात केली. त्यानंतर भार्गवराम पेडगावकरने जिगर देशमुखला २१-११, २१-१५ अशी मात करीत औरंगाबादला अंतिम फेरीत धडक मारण्यात योगदान दिले. त्यानंतर अंतिम फेरीत औरंगाबादने पुणे संघावर मात करीत विजेतेपदाला गवसणी घातली. प्रथमेश कुलकर्णी याने पहिल्या एकेरीत ध्रुव ठाकूरला २१-११, २१-१५, असे पराभूत करीत औरंगाबादला १-० अशी आघाडी मिळवून दिली; परंतु प्रथमेश कुलकर्णी व सुधांशू शिंदे या जोडीला दुहेरीत ध्रुव ठाकूर व आर्य ठाकूर या जोडीकडून १५-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. तथापि, दुसºया एकेरीत भार्गवराम पेडगावकरने प्रीत ओस्तवालचे आव्हान २१-११, २१-१९ असे मोडीत काढताना संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, मुलींच्या गटात औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधित्व करणाºया एस.बी.ओ.ए. शाळेने अमरावती संघास २-० असे पराभूत करीत कास्यपदक जिंकले. औरंगाबादकडून सोनाली मिरखेलकर, समीक्षा नलावडे यांनी प्रभावी कामगिरी केली. या संघाला प्रशिक्षक ऋतुपर्ण कुलकर्णी, हिमांशू गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा माने, मनीषा यादव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Web Title: Aurangabad Gold in the State Badminton Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.