लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर लिखित ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी ५.३० वाजता तापडिया नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
पुस्तकाचे प्रकाशन भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ऋषीकुमार बागला राहतील. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम हे प्रमुख पाहुणे असतील. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख पुस्तकावर भाष्य करतील. सॉफ्ट स्किल्सचा सुयोग्य पद्धतीने कसा अंगीकार करावा हेच या पुस्तकातून मांडलेले आहे, अशी माहिती धानोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी धानोरकर यांनी अभिवाचन केलेल्या व राजेंद्र जोशी निर्मित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या डीव्हीडीचेही प्रकाशन करण्यात येईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक बाबा भांड यांनी केले आहे.