तोतया लाईनमने वृद्ध महिलेच्या घरातून पळविले अडीज लाखाचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 04:55 PM2017-11-24T16:55:54+5:302017-11-24T16:57:09+5:30

औरंगाबाद : लाईटचे मीटर तपासणी करण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी वृद्ध दाम्पत्याला फसवत घरातून दोन लाख ४० हजाराचे ...

Adi Lakhan Jewelery escaped from the house of an old woman | तोतया लाईनमने वृद्ध महिलेच्या घरातून पळविले अडीज लाखाचे दागिने

तोतया लाईनमने वृद्ध महिलेच्या घरातून पळविले अडीज लाखाचे दागिने

googlenewsNext
ठळक मुद्देतुम्ही लाईट बील भरले का असे विकारात त्यांनी कागदपत्रे दाखविण्याचे सांगितले. घरातील वीजचे साहित्य काय, काय आहेत, याची पहाणी करायची असल्याचे सांगून ते स्टोअर रूममध्ये गेले.

औरंगाबाद : लाईटचे मीटर तपासणी करण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी वृद्ध दाम्पत्याला फसवत घरातून दोन लाख ४० हजाराचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि. २३) सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास सिडको एन-९ मधील शिवाजीनगरात घडली.

याविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अनुपमा अविनाश परमार या गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या पतीसह घरी होत्या. यावेळी ४५ ते ५० वयाचे दोन जण दुचाकीवर त्यांच्या घरासमोर येऊन थांबले. यावेळी त्यांनी तुम्ही लाईट बील भरले का असे विकारात कागदपत्रे दाखविण्याचे सांगितले. यावेळी तक्रारदार यांनी त्यांना वीज बील दाखविले असता तुम्हाला बील जास्त येते आहे , तुमच्या मिटरची तपासणी करावी लागेल  असे म्हणून आरोपी घरात घुसले. 

काही वेळाने त्यांनी लाईट बीलाची झेरॉक्स प्रत आणण्याचे तक्रारदार यांना सांगितले. यामुळे अनुपमा या झेरॉक्स आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. यावेळी घरी असलेल्या वृद्ध अविनाश परमार यांना त्यांनी घरातील वीजचे साहित्य काय, काय आहेत, याची पहाणी करायची असल्याचे सांगून ते स्टोअर रूममध्ये गेले. तेथील लोखंडी कपाटाला चावी लटकलेली होती. ही चावी घेऊन त्यांनी कपाट उघडले आणि कपाटातील रोख एक लाखाचे सोन्याचे नेकलेस, पन्नास हजाराची सोन्याची चैन, २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, ८० हजार किंमतीच्या अंगठ्या  आणि २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील अलंकार त्यांनी गुपचूप काढून घेतले. 

यावेळी पुन्हा कपाट बंद करून ते समोरच्या हॉलमध्ये आले आणि तेथून बाहेर पडले अन पसार झाले. लाईट बील चे झेरॉक्स घेऊन घरी परतलेल्या अनुपमा या घरी परतल्या तोपर्यंत भामटे निघून गेले होते. त्यांनी आत जाऊन पहाणी केली असता भामट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती सिडको पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याविषयी रात्री उशीरा गुन्हा नोंदविण्यात आला.

असे दिसतात आरोपी
परमार दाम्पत्याची फसवणुक करणारे दोन्ही भामटे ४५ ते ५० वयाचे आहेत. एक जण शरीराने मध्यम तर दुसरा सडपातळ आहे. दोन्हीही रंगाने सावळे, त्यांची चेहरे गोल, हिंदी आणि मराठी बोलतात.एकाच्या अंगात पांढरा शर्ट तर दुसºयाने राखाडी शर्ट घातलेला होता.

Web Title: Adi Lakhan Jewelery escaped from the house of an old woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.