निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात २,७०० पोलिसांचा कडक बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:38 PM2019-04-17T23:38:55+5:302019-04-17T23:39:43+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत २,७०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त राहणार असून, ५४ संवेदनशील केंद्रांसह लक्ष ठेवण्यासाठी सशस्त्र पोलिसांचा पहारा व गस्त कॅमेरे असलेल्या वाहनांचा समावेश राहणार आहे. सर्व केंद्रांवर २१ पासूनच कर्मचारी बंदोबस्त लावला जाणार आहे.

According to the election, the strict settlement of 2,700 police stations in the city | निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात २,७०० पोलिसांचा कडक बंदोबस्त

निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात २,७०० पोलिसांचा कडक बंदोबस्त

googlenewsNext
ठळक मुद्देदैनंदिन कामकाजासाठी २० टक्के : ८० टक्के अधिकारी, कर्मचारी, एसआरपी, सशस्त्र पोलीस लक्ष ठेवणार

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत २,७०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त राहणार असून, ५४ संवेदनशील केंद्रांसह लक्ष ठेवण्यासाठी सशस्त्र पोलिसांचा पहारा व गस्त कॅमेरे असलेल्या वाहनांचा समावेश राहणार आहे. सर्व केंद्रांवर २१ पासूनच कर्मचारी बंदोबस्त लावला जाणार आहे.
निवडणूक सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील १,१६८ मतदान केंद्रांवर २,७०० पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांना कव्हर करण्यासाठी झोननुसार अधिकारी, वाढीव कर्मचारी, सशस्त्र पोलिसांचे फिरते पथक, दंगाकाबू यंत्रणा, कॅमेरादेखील केंद्र व केंद्राबाहेरील परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे. एसआरपीच्या दोन कंपन्या, होमगार्ड, विशेष पथकाच्या प्लाटून, महिला कर्मचारी, अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. आॅनलाईन यंत्रणा कार्यरत असून, संवेदनशील केंद्रावर प्रत्येकानी संशयास्पद हालचालीचे रिपोर्टिंग त्वरित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
२० कर्मचारी दैनंदिनी कामात, ८० बंदोबस्तासाठी
निवडणुकीच्या अनुषंगाने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रत्येक ठाण्यात दैनंदिन कामकाजासाठी २० टक्के कर्मचारी उपलब्ध राहतील, तर ८० टक्के अधिकारी, तसेच कर्मचारी बंदोबस्तकामी मतदान केंद्रावर लक्ष ठेवणार आहेत. विशेष शाखा, गुन्हे शाखा, तसेच इतर पथके संवेदनशील केंद्र, तसेच शहरातील हालचालीवर नजर ठेवणार आहे. उच्च दर्जाचे सीसीटीव्हीचे कॅमेरे अधिकाऱ्यांच्या वाहनावर बसविण्यात आले असून, ते १ किलोमीटरपर्यंतचे चित्र कॅप्चर करू शकते. गस्तीप्रसंगी गडबड, गोंधळ करणाºयांचे फुटेज मिळवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
पोस्टल मतदान
आयुक्तालयातील हद्दीतील कर्मचाºयांचे जवळपास २ हजार मतदान असून, जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत त्या कर्मचाºयांना इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. ते ज्या बुथवर कर्तव्यास असतील तिथे त्यांना ईडीसीमुळे मतदान करता येणार असल्याचे विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी सांगितले.
 

Web Title: According to the election, the strict settlement of 2,700 police stations in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.