नगराध्यक्षपदासाठी ९, नगरसेवकासाठी १०४ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:20 AM2019-02-19T01:20:44+5:302019-02-19T01:21:01+5:30

सिल्लोड न.प. निवडणूक : १३ प्रभागांत २७ जागांसाठी ११३ जण मैदानात

 9 for municipal chief, 104 candidates for the corporator in the fray | नगराध्यक्षपदासाठी ९, नगरसेवकासाठी १०४ उमेदवार रिंगणात

नगराध्यक्षपदासाठी ९, नगरसेवकासाठी १०४ उमेदवार रिंगणात

googlenewsNext

सिल्लोड : सिल्लोड नगर परिषद निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ पैकी दोघांनी माघार घेतल्याने ९ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी, तर नगरसेवकपदासाठी १२० पैकी १६ जणांनी अर्ज परत घेतल्याने १०४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १३ प्रभागांमध्ये २७ जागांसाठी ११३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. २७ फेब्रूवारी रोजी मतदान होणार आहे.
उमदेवारांच्या सोयीसाठी प्रशासनाने एक खिडकी योजना अंमलात आणलेली आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी रामेश्वर गोरे, सय्यद रफिक कंकर यांची उपस्थिती होती.
यांनी घेतली माघार
नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करणाऱ्या उत्तम दांडगे व सचिन साबळे या दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. नगरसेवकासाठी अंजली अनिल साबले, शामराव आळणे, अमोल कुलकर्णी, कृणाल सहारे, देवलाल दुधे, निमी कोकाटे, संदीप सापकार, काकासाहेब मोरे, सोहेल बेग मिर्झा, अब्दुल समीर, शेख मलेका, रवी रासने, नारायण पुरी, रूख्मणबाई सोनवणे, शेख सद्दाम, शेख रेहान यांनी माघार घेतली.

Web Title:  9 for municipal chief, 104 candidates for the corporator in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.