ट्रक-बस अपघातात १८ प्रवासी जखमी

By Admin | Published: September 14, 2014 11:54 PM2014-09-14T23:54:11+5:302014-09-14T23:57:15+5:30

जालना : बीड मार्गावर भरधाव वेगातील मालमोटारीने समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. यात बस चालक आत्माराम भिमराव जावळे यांचा पाय फॅक्चर झाला.

18 passengers injured in truck-bus crash | ट्रक-बस अपघातात १८ प्रवासी जखमी

ट्रक-बस अपघातात १८ प्रवासी जखमी

googlenewsNext

जालना : बीड मार्गावर भरधाव वेगातील मालमोटारीने समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. यात बस चालक आत्माराम भिमराव जावळे यांचा पाय फॅक्चर झाला. जखमी झालेले प्रवासी मात्र पोलिसात नोंद न करताच निघून गेले. त्यामुळे जखमी प्रवाशांची माहिती मिळू शकली नसल्याचे गोंदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सांगितले.
याप्रकरणी १३ सप्टेंबर रोजी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ११ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता शहापूर शिवारात घडली होती. राज्य परिवहन महामंडळाकडून एकाही प्रवाशाला मदत मिळू शकली नाही. बीडहून औरंगाबादकडे जाणारा ट्रक (एम.एच. ०९ एच.जी. २५७४) जालन्याहून तुळजापूरकडे जाणाऱ्या बसला (एम.एच. २० बी.एल. १७८२) समोरून जोरदार धडक दिली. ही धडक ऐवढी जबर होती की, प्रवासी एकमेकांवर फेकले गेले. जखमी अवस्थेतील प्रवासी मिळेल त्या वाहनाने अंबड, गेवराई व वडिगोद्री येथे सरकारी दवाखान्यात उपचारासाठी निघून गेल्याचे घोरबांड यांनी सांगितले. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: 18 passengers injured in truck-bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.