युवराज, प्रशांतच्या पाठीशी तरुणाईचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:59 PM2019-01-07T22:59:18+5:302019-01-07T22:59:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मोफत शिक्षणाबाबत काही तरी ऐकायला मिळेल, ही अपेक्षा असताना शिक्षणमंत्र्यांकडून मानहानी झेलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ...

Yuvraj, Prashant's support for youth's youth | युवराज, प्रशांतच्या पाठीशी तरुणाईचे बळ

युवराज, प्रशांतच्या पाठीशी तरुणाईचे बळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मोफत शिक्षणाबाबत काही तरी ऐकायला मिळेल, ही अपेक्षा असताना शिक्षणमंत्र्यांकडून मानहानी झेलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी तरुणाईचे बळ एकवटल्याचे सोमवारी निदर्शनास आले. ५० विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेतून पायी मार्च काढत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपल्या व्यथांवर फुंकर घालण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांची मागणी शासनाकडे पाठविली जाईल, असे आश्वस्त केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेत आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ४ जानेवारीला शिक्षणमंत्री विनोद तावडे आले होते. यावेळी शिवाजी, कला, वाणिज्य महाविद्यालयातील जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण मोफत कधी मिळणार, असा प्रश्न केला होता. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी ‘झेपत नसेल तर नोकरी कर’, असे उत्तर देऊन त्या संवादाचे व्हिडीओ शुटिंग करणाऱ्या अन्य एका विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश तावडे यांनी दिले होते. एवढेच नव्हे तर संबंधित विद्यार्थ्याकडील मोबाईल पोलिसांकरवी ताब्यात घेऊन त्यातील डेटा डिलिट केला. शिक्षणमंत्र्यांना विचारलेला प्रश्न आणि त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर हे अगदी सामान्य पातळीवर अपेक्षित असताना तावडे यांनी हा मुद्दा भलतीकडे वळविला.
दरम्यान सोमवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतून विद्यार्थ्यांनी सकाळी ११.३० वाजता गर्ल्स हायस्कूल चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे सर्वप्रथम शहीद मुन्ना सेलुकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. युवराज व प्रशांत यांनी शिक्षणमंत्र्यांच्या गैरवर्तणुकीबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना अवगत केले. यानंतर या दोघांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मानहानीचा मुद्दा जिल्ह्याची सीमा ओलांडून राज्यभर गाजत आहे. ठिकठिकाणी युवावर्गाकडून या घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या पोस्टरला चपलांनी बदडले
अमरावती : विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश देणारे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे ‘शायना’ असे फलक झळकवित एनएसयूआय कार्यकर्त्यांनी त्यावर चपलांचा मारा केला. जिल्हा कचेरीत हे आंदोलन सोमवारी करण्यात आले.
शिक्षणमंत्र्यांच्या कृतीच्या निषेधार्थ त्यांच्या मतदारसंघात जाऊन या घटनेतील सत्य परिस्थिती सांगू, असा इशारा एनएसयूआयने दिला आहे. मोबाइलचा डेटा डिलीट करण्याचा प्रकार हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. याविरोधात दोषी अधिकारी व शिक्षणमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे एनएसयूआयचे राष्ट्रीय समन्वयक अक्षय भुयार म्हणाले. जिल्हाध्यक्ष संकेत कुलट, राष्ट्रीय समन्यक अक्षय भुयार, प्रज्वल गावंडे, सर्वेश खांडे, आदित्य साखरे, प्रणव बुरंगे, प्रथमेश गवई, अभिराज निंबेकर, गौरव सोलव, करण खोडके, अर्थव वंजारी, भूषण वाघमारे, स्नेहदिप तायवाडे यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
शिक्षणमंत्र्यांची हकालपट्टी करा
अमरावती : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सरकारमधून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. महाविद्यालय परिसरातून विद्यार्थ्यांना बेकायदेशीर अटक, मोबाइल जप्त तसेच डेटा डिलिट केल्याप्रकरणी दोषींवरही तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष पकंज मोरे यांच्या नेतृत्वात रवि रायबोले, रोहित देशमुख, सागर कावरे, सागर कलाने, नीलेश गुहे, रीतेश पांडव, सागर यादव, किरण महल्ले, अंकुश जुनघरे, सौरभ किरकटे, प्रथमेश गवई, गुड्डू हमीद, संकेत शाहू, संकेत बोके, सूरज अडायके आदींनी केली आहे.

Web Title: Yuvraj, Prashant's support for youth's youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.