यवतमाळ ७ डिसेंबरला कापूस उत्पादकांची परिषद, गुलाबी बोंडअळीच्या संकटावर काढणार उतारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 05:54 PM2017-12-05T17:54:59+5:302017-12-05T17:55:13+5:30

अमरावती : गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेल्या संकटाने आता विदर्भ व मराठवाड्यासह मध्य प्रदेश, गुजरात व्यापले.

Yavatmal will deduce the cotton growers' conference on December 7, and the pink bollworm crisis | यवतमाळ ७ डिसेंबरला कापूस उत्पादकांची परिषद, गुलाबी बोंडअळीच्या संकटावर काढणार उतारा

यवतमाळ ७ डिसेंबरला कापूस उत्पादकांची परिषद, गुलाबी बोंडअळीच्या संकटावर काढणार उतारा

Next

अमरावती : गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेल्या संकटाने आता विदर्भ व मराठवाड्यासह मध्य प्रदेश, गुजरात व्यापले. दशकात प्रथमच आलेल्या संकटावर मात करून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ येथे ७ डिसेंबर रोजी कापूस उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन आहे.

शेतकरी मिशन, कृषी विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व त्यांच्याशी जुळलेले महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्व. जवाहरलाल दर्डा सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा व शेतकरी परिषद आयोजित केली आहे. यामध्ये गुलाबी बोंडअळीच्या अभूतपूर्व संकटावर तोडगा व पर्याय काढणे, गुलाबी बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात रेटून शेतक-यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी व गुलाबी बोंडअळीच्या संकटातून कायम सुटका व्हावी, यासाठीचे ठराव व प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येतील.

बोंडअळीची समस्या निवारणासाठी परिषदेत शाश्वत शेतीचे अभ्यासक प्रकाश पोहरे, जैविक शेतीचे प्रणेते मनोहरराव परचुरे, केंद्रीय कापूस अनुसंधान परिषदेचे संशोधक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सल्लागार, कृषी विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील, अशी माहिती शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.

संकटाचे कारण शोधणार
बोंडअळी समस्या निवारणासाठी कापूस उत्पादक कृषी क्षेत्रात कार्य करणा-या सर्व संस्था, शेतकरी, शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते, बियाणे उत्पादकांचे प्रतिनिधी आदी एकाच व्यासपीठावर तोडगा काढणार आहेत. गुलाबी बोंडअळीच्या संकटाचे मूळ कारण, त्यावर चिंतन व तोडगा काढण्यात येणार आहे. शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यशाळेद्वारे प्रयत्न होणार आहे.

Web Title: Yavatmal will deduce the cotton growers' conference on December 7, and the pink bollworm crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी