आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:05 PM2018-09-22T23:05:55+5:302018-09-22T23:06:46+5:30

पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पाहणी दौºयाच्या अनुषंगाने शनिवारी १७ कनिष्ठ कर्मचाºयांवर निलंबन व अन्य कारवाई करण्यात आली. तथापि, डेंग्यूच्या प्रकोपास जबाबदार असलेल्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यावर कारवाई करण्यास महापालिका आयुक्तांना मुहूर्त मिळालेला नाही.

When to take action on the health officer? | आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई केव्हा?

आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई केव्हा?

Next
ठळक मुद्देकानउघाडणीनंतर जाग : आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर वरदहस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पाहणी दौºयाच्या अनुषंगाने शनिवारी १७ कनिष्ठ कर्मचाºयांवर निलंबन व अन्य कारवाई करण्यात आली. तथापि, डेंग्यूच्या प्रकोपास जबाबदार असलेल्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यावर कारवाई करण्यास महापालिका आयुक्तांना मुहूर्त मिळालेला नाही.
गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्यापाठोपाठ पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीही डेंग्यूच्या प्रकोपाची दखल घेऊन महापालिका आयुक्तांना कठोर कारवाईचे निर्देश दिले. तथापि, आयुक्त निपाणे यांनी पाच कनिष्ठ कर्मचाºयांचे निलंबन व एका कंत्राटी कर्मचाºयाला कामावरून कमी करण्याची कारवाई केली तथा नैताम यांच्यावरील वरदहस्त कायम ठेवला. त्याअनुषंगाने नैताम यांच्यावर कारवाई केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, शहरात सर्वदूर पसरलेला डेंग्यू व साथीच्या अन्य आजारांबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी कानउघाडणी केल्यानंतर महापालिका प्रशासन आणि विशेषत: स्वच्छता विभाग ताळ्यावर आला. यंत्रणा खरोखर ताळ्यावर आली का, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. तथापि, दोन दिवसांपासून कचºयाने ओसंडून वाहणारे कंटेनर रिकामे दिसू लागले आहेत.
सलग दोन दिवस शहरातील कानाकोपºयात कंटेनर व नाल्यांमधील अस्वच्छतेची पाहणी करून पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दम भरला. ही आमदारांची नव्हे, तर पालकमंत्र्यांची अन् एका अर्थाने ‘सरकार’ची बैठक असल्याचे स्पष्ट करीत शहर स्वच्छतेबाबतचे इरादे जाहीर केले. त्यानंतर आयुक्तांना शहरातील अस्वच्छतेची जाणीव झाली. शहर स्वच्छतेसाठी पालकमंत्र्यांना बैठक घ्यावी लागत असेल, नगरसेवकांशी बोलून, भेटून त्यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घ्यावी लागत असेल, तर स्वच्छता विभागातील अधिकारी-कर्मचाºयांचे कामच काय, असा खडा सवाल पोटे यांनी आयुक्तांना केला. परिणामी आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेला ‘कचऱ्यात पैसे खाऊ नका’ असा सल्ला वजा आदेश देऊन शहर स्वच्छतेची जबाबदारी आपली असल्याची जाणीव करून दिली. आरोग्य अधिकारी सीमा नैताम, स्वच्छता विभागाचे उपायुक्त नरेंद्र वानखडे आणि पाचही सहायक आयुक्तांसह स्वास्थ्य अधीक्षक, स्वास्थ्य निरीक्षक, वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, बीटप्यून व स्वच्छता कंत्राटदारांची त्यांनी कानउघाडणी केली. डेंग्यूने मृत्यू झाल्यास दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध आपण स्वत: सदोष मनुष्यवधाची फिर्याद दाखल करू, अशी तंबी दिल्याने तर अख्खी यंत्रणा ताळ्यावर आली. नाल्यातील गाळ काढण्यात आला.
आठ दिवसानंतरही न उचलण्यात आलेले कचºयाने भरलेले कंटेनर सुकळी कंपोस्ट डेपोत पाठविण्यात आले. शहरात ज्या ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणी शनिवारी कमालीची स्वच्छता आढळून आली. कंटेनरलगत कचरा नव्हता. रस्तालगत कचऱ्यांचे ढीग साफ करण्यात आले.
दोन दिवसांचा अल्टिमेटम संपला
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी डेंग्यूबाबत आढावा बैठक घेऊन महापालिका प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. कठोर कारवाईची तंबी मिळाल्याने स्वच्छता विभाग कामाला लागला. यंत्रणेने स्वच्छतेबाबत घेतलेला पुढाकार कायम ठेवावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

Web Title: When to take action on the health officer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.