रोपवाटिकेत पाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:46 PM2018-02-21T22:46:18+5:302018-02-21T22:46:36+5:30

मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी वनविभागाने नजीकच्या तलावातून पाण्याची चक्क चोरी चालविली आहे.

Water theft in nursery | रोपवाटिकेत पाणी चोरी

रोपवाटिकेत पाणी चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देपाझर तलावात इंजीन लावले : मोर्शी रोहयो परिक्षेत्राचा अफलातून कारभार

आॅनलाईन लोकमत
अमरावती : मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी वनविभागाने नजीकच्या तलावातून पाण्याची चक्क चोरी चालविली आहे. दरदिवशी तलावातून हजारो लिटर पाणी रोपवाटिकेमध्ये रिते केले जात आहे.
मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड तलावाला लागून रोजगार हमी योजनेमधून रोपवाटिका तयार करण्यात आली. रोपवाटिका तयार करण्यापूर्वी वनविभागाने त्या ठिकाणी नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी बोअर किंवा विहीर तयार करणे गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून रोपवाटिकेतील रोपांना वाचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाझर तलावानजीक इंजिन बसवून लोखंडी पाइपने पाणी आणून रोपवाटिकेतील टाक्यांमध्ये गोळा केले जाते आणि ते रोपांना देण्यात येत आहे.
दिवाणखेड गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी, याकरिता वनक्षेत्रावर या पाझर तलावाची उभारणी करण्यात आली. मात्र, रोहयो रोपवाटिकेत कार्यरत असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी कसलीही परवानगी न घेता पाणी चोरी करून रोपटे जगविण्याची शक्कल लढविली आहे.
रोपे जगविण्यासाठी पाणी आवश्यक असल्यास नियमानुसार जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडून परवानगी घेऊनच तलावातून पाण्याची उचल करणे अपेक्षित आहे. शासकीय विभाग नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी तत्पर असतात. अशा स्थितीत संबंधित वनाधिकाºयांनी हा प्रकार कशासाठी करावा, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिंचन विभाग अनभिज्ञ
दिवाणखेड येथील पाझर तलाव जि.प.च्या अखत्यारीत येतो. या तलावातून पाण्याची चोरी होत असताना सिंचन विभाग अनभिज्ञ आहे. रोपवाटिकेतील रोपांना व इतर कामांसाठी पाण्याची गरज असताना संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी रीतसर परवानगी घेऊन तलावातील पाण्याची उचल करणे आवश्यक आहे. रोपवाटिकेत दरदिवशी हजारो लिटर रिते केले जात असल्याचे वास्तव आहे.

वनविभाग सिंचन तलावातून पाणी घेत असल्याबाबत परवानगी घेतली अथवा नाही. याबाबत तपासले जाईल. यात काही गैर असल्यास नियमानुसार कारवाई करू.
- प्रमोद तलवारे,
जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Water theft in nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.