शेंदोळा खुर्द येथे दहा दिवसांनी पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:16 AM2019-06-03T01:16:07+5:302019-06-03T01:16:47+5:30

तालुक्यातील आदर्शग्राम व मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा (खुर्द) येथील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. येथे अजूनही आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.

Water supply after 10 days at Sainthola Khurd | शेंदोळा खुर्द येथे दहा दिवसांनी पाणीपुरवठा

शेंदोळा खुर्द येथे दहा दिवसांनी पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देविहीर, बोअरचे अधिग्रहण : नळावरील वादामुळे टँकरला नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यातील आदर्शग्राम व मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा (खुर्द) येथील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. येथे अजूनही आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे. भीषण पाणीटंचाई असूनही गावात आपसात वादविवाद निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने टँकरने होणारा पाणी पुरवठा नाकारला आहे.
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शेंदोळा (खुर्द) या गावातील नागरिकांसाठी आरओ प्लाँट आहे. पाच रुपयांचा शिक्का टाकल्यानंतर कॅनभर पाणी मिळते. मात्र लगतच्या अन्य गावात पाणीटंचाई असल्याने थंड व शुद्ध पाण्यासाठी शेंदोळा खुर्द येथे नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे स्थानिकांनाच पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गावात दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने गावातील एक विहीर व बोअर अधिग्रहित करण्यात आल्या. तरीही गावात पाणी समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आणखी काही शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित करण्याच्या हालचाली ग्रामपंचायतीने चालविल्या आहेत. गावात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात कुलर सुरू असल्याने पाण्याची मागणी वाढली असली तरी शेंदोळा येथे टँकरने पाणी पुरवठा केला जात नाही. कारण टँकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांची धावाधाव होते. त्यात वादही होतो. हाणामारीपर्यंत वाद पोहोचल्यास गावातील शांततेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीने टँकरची मागणी प्रशासनाकडे केलेली नाही.
सरपंचपद रिक्त, उपसरपंचांकडे प्रभार
शेंदोळा खुर्द येथील तत्कालीन सरपंचा मेघा नागदिवे यांना मागील वर्षी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी महिनाभरापूर्वी नागदिवे यांना ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदासाठी अपात्र ठरविले. त्यामुळे सरपंचपद रिक्त असून उपसरपंचाकडे प्रभार देण्यात आला आहे. सहा महिन्यांपासून हा वाद सुरू असल्याने शासकीय काम थंडावले. पाणीटंचाईवर उपाययोजना सुचविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पाणी नागरिकांना पाणीटंचाईची झळ पोहचत आहे.

Web Title: Water supply after 10 days at Sainthola Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.