अमरावतीमधील कम्पोस्ट डेपोमुळे ९०० टीडीएसपर्यंत जलप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:42 PM2018-12-19T12:42:18+5:302018-12-19T12:44:08+5:30

शहरालगतच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोमुळे या भागातील बोअरच्या पाण्यात ९०० टीडीएसपर्यंत प्रदूषित घटक आढळले आहेत. या पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार जडले आहेत.

Water contamination till 9 00 TDS due to Compost Depot in Amravati | अमरावतीमधील कम्पोस्ट डेपोमुळे ९०० टीडीएसपर्यंत जलप्रदूषण

अमरावतीमधील कम्पोस्ट डेपोमुळे ९०० टीडीएसपर्यंत जलप्रदूषण

googlenewsNext
ठळक मुद्दे१८ वर्षांपूर्वीच संपली डेपोची मुदत महापालिका प्रशासनाचा नागरिकांच्या जिवाशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरालगतच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोमुळे या भागातील बोअरच्या पाण्यात ९०० टीडीएसपर्यंत प्रदूषित घटक आढळले आहेत. या पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार जडले आहेत.
कम्पोस्ट डेपोत कचरा टाकण्याची मर्यादा १८ वर्षांपूर्वीच संपली. भागातील नागरिकांनी केला. महापालिका प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आक्षेप नागरिकांना महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. कम्पोस्ट डेपोला खेटून हनुमाननगर, हैदरपूरा, भाजीबाजार, खोलापुरी गेट, पठाणचौक, लालखडी, महाजनपुराआदी अनेक जुन्या वस्त्या आहेत. या कंपोस्ट डेपोची मर्याचा सन २००० मध्ये संपुष्टात आली. त्यानंतरही १८ वर्षांपासून येथे दररोज ३०० ते ४०० ट्रक कचरा रिचविला जात आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित झालेले आहे. अनेक नागरिक आजाराचे बळी ठरत आहेत.

सुकळीच्या नावावर पेठ अमरावतीला डेपो
महापालिकेद्वारा सुकळी येथे डेपो दाखविण्यात येत असला तरी प्रत्यक्षात हा कम्पोस्ट डेपो मौजा पेठ अमरावती भागात आहे. महापालिकेने यासाठी कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्याचा आरोप दिनेश वडुरकर, मोहमद अफसर, शेखर पवार, शेख शकील, मो. सलीम, अ. शकील, अ. सत्तार, अताउल्ला खाँ आदींनी दिलेल्या निवेदनात केला आहे.

धुळीमुळे कोणतेही पीक घेणे कठीण
सन १९९९ मध्ये या भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी महापालिकेच्या अधिकाºयांनी अकोली वळणरस्त्याच्या नावाने शेतकºयांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या. आता प्रत्यक्षात या जमिनीचा उपयोग कचरा वाहतुकीसाठी केल्या जात आहे. या रस्त्याने ट्रकची वाहतूक असल्याने रात्रंदिवस धूळ व मातीचा थर लगतच्या शेतांमधील पिकांवर साचतो. परिणामी या शेतांमध्ये कोणत्याही प्रकारच्या पिकाचे उत्पन्न येत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

Web Title: Water contamination till 9 00 TDS due to Compost Depot in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य