‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ तंत्रज्ञानाअभावी भकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:12 AM2018-07-10T00:12:17+5:302018-07-10T00:12:33+5:30

'Vidharbha's California' technology failed due to lack of technology | ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ तंत्रज्ञानाअभावी भकास

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ तंत्रज्ञानाअभावी भकास

Next
ठळक मुद्देसंत्रा उत्पादकांची करुण कहाणी : लिंबूवर्गीय संशोधन केंद्र निकडीचे

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ हे बिरूद संत्रा उत्पादकांसाठी उभारल्या न गेलेल्या तंत्रज्ञानाअभावी तकलादू ठरले आहे. संत्रा उत्पादकांचा स्वबळावर उपाययोजना करून संत्रा जगविण्याचे प्रयत्न सुरू असला तरी फळाला परप्रांतीय बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने उत्पादक डबघाईस आले आहे. संत्रा साठवणुकीकरिता शीतगृहे आणि प्रक्रिया केंद्र नाही. याशिवाय येथे लिंबूवर्गीय संशोधन केंद्र असणे काळाची गरज झाली आहे.
वरुड तालुक्यात २१ हजार हेक्टर जमिनीवर संत्रा आहे. सन १९४५ पासून संत्रा लागवडीला परिसरात सुरुवात झाली. सर्वप्रथम १९५७ मध्ये सहकारी तत्त्वावर शेंदूरजनाघाट येथे ज्यूस फॅक्टरी ‘अमरावती जिल्हा फळ बागायतदार रस उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, शेंदूरजनाघाट’ नावाने स्वबळावर उभी करण्यात आली. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर १९६० रोजी इमारतीच्या भूमिपूजनाची कोनशिला रोवण्यात आली. त्या काळात देशाच्या मुख्य शहरात ज्यूस पाठविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, राजाश्रय मिळाला नसल्याने पाच वर्षांत फॅक्टरी कर्जबाजारी झाली आणि मध्यवर्ती बँकेलाच ही जागा विकावी लागली. वरूडमध्ये सोपॅक ही खासगी फॅक्टरी १९९२ मध्ये उभी राहिली, तीही बंद पडली. मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे शासनाचा नोगा प्रकल्पही सुरू होताच बंद पडला.
यशवंतराव चव्हाण हे वरुड भागात महात्मा फुले महाविद्यालयाच्या भूमिपूजनाकरिता आले असता, परिसरातील संत्राउत्पादन तसेच कृषिवैभव पाहून ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून संबोधले होते. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे संत्राबागा नेस्तनाबूत आणि उत्पादक डबघाईस आले आहेत.
संत्रा फळापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच टरफलापासून डिटर्जंट पावडर बनविली जाऊ शकते. देशी-विदेशी दारूची वायनरी होऊ शकते. परंतु, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे ना ज्यूस फॅक्टरी, ना वायनरी सुरू होऊ शकली. संत्र्याचा कृत्रिम स्वाद घालून तयार केलेली देशी दारूच विकली जाईल का, हादेखील प्रश्न आहे. याशिवाय शेतीव्यतिरिक्त राबणारे हजारो हातांना काम मिंळाले नाही.
शीतगृहासह ग्रेडिंग आणि व्हॅक्सिनेशनचा प्रयत्न !
दिवंगत वासुदेव देशपांडे यांच्या पुढाकाराने आॅरेंज सिट्रस किंग या नावाने शीतगृह आणि व्हॅक्सिनेशन प्रकल्प सुरू करून हॉलंड, दुबईसह आदी अरब राष्ट्रात येथून संत्र्याचे कंटेनर भरून गेले. सहकारी तत्त्वावरची ही संस्था डबघाईस आल्यानंतर बाजार समितीचे तत्कालीन सभापती रमेशपंत वडस्कर आणि नरेंद्र चोरे यांनी ही यंत्रणा खरेदी करून शेतकऱ्यांच्या संत्र्याला योग्य भाव आणि साठवणुकीसाठी प्रयत्न केले. अशा एक ना अनेक प्रकल्प सहकारी तत्त्वावर उभे राहिले आणि कोलमडले, हे वास्तव आहे.
राज्यातील पहिला संत्रा डिहायड्रेशन प्रकल्प वरूडमध्ये उभारला जाईल. त्यामुळे येथील शेतकºयांना सुगीचे दिवस येतील. मोर्शीत संत्रा रस प्रक्रिया केंद्र सुरू करून त्याचे ब्रँडिंग केले जाईल, अशी घोषणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅक्टोबर २०१५ मध्ये संत्रा महोत्सवादरम्यान केली होती. या प्रकल्पाची आता कोठेही वाच्यता केली जात नाही, तर उलट हा प्रकल्प फिजिबल नसल्याचे सांगण्यात येते.

संत्रा डिहायड्रेशन प्रकल्पाचे काय?
राज्यातील पहिला संत्रा डिहायड्रेशन प्रकल्प वरूडमध्ये उभारला जाईल. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील. मोर्शीत संत्रा रस प्रक्रिया केंद्र सुरू करून त्याचे ब्रँडिंग केले जाईल, अशी घोषणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅक्टोबर २०१५ मध्ये संत्रा महोत्सवादरम्यान केली होती. या प्रकल्पाची आता कोठेही वाच्यता केली जात नाही, तर उलट हा प्रकल्प फिजिबल नसल्याचे सांगण्यात येते.

Web Title: 'Vidharbha's California' technology failed due to lack of technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.