‘ट्रायबल’ घोटाळाप्रकरणी पुन्हा दोघांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 04:27 PM2018-07-22T16:27:42+5:302018-07-22T16:27:46+5:30

नंदूरबार, किनवट पोलिसांत गुन्हे : कन्यादान योजनेतील मंगळसूत्र गायब झाल्याचा आरोप

'Tribal' scam again faces criminal charges | ‘ट्रायबल’ घोटाळाप्रकरणी पुन्हा दोघांवर फौजदारी

‘ट्रायबल’ घोटाळाप्रकरणी पुन्हा दोघांवर फौजदारी

Next

अमरावती : आदिवासी विकास विभागामार्फत राबविलेल्या विविध योजनांमध्ये घोटाळाप्रकरणी नंदूरबार व किनवट पोलिसांत अधिकाºयांवर फौजदारी दाखल झाली  आहे. कन्यादान योजनेतील मंगळसूत्र गायब तसेच एच.डी.पी.व्ही.सी. पाइप व सायकली वाटपात अपहार झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यात नंदूरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी शैला हेमंत वळवी आणि किनवट येथील माजी प्रकल्प अधिकारी श्यामराव गुणाजी वागतकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४ अन्वये ४०९, ४२० नुसार २० जुलै रोजी पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.
माजी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेतील चौकशी समितीच्या अहलवालानुसार, नाशिक, ठाणे, नागपूर व अमरावती अपर आयुक्त क्षेत्रांतर्गत एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयस्तरावर ट्रायबल योजनांमध्ये सन २००४ ते २००९ या कालावधीत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने १० जुलै २०१८ रोजी सिव्हिल अप्लिेकशन क्रमांक ७५१५/२०१८ अन्वये सुनावणीदरम्यान दोषींवर गुन्हे, विभागीय चौकशी करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने गत १५ दिवसांपासून चांद्यापासून तर बांद्यापर्यंत ट्रायबल योजनांमध्ये दोषींवर फौजदारी दाखल करण्याचे सत्र सुरू झाले आहे. नंदुरबार पोलिसांत प्रदीप देसाई यांच्या तक्रारीवरून शैला वळवी, तर किनवटमध्ये छंदक लोखंडे यांच्या तक्रारीवरून श्यामराव वागतकर यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले आहे. शैला वळवी यांनी सन २००७ ते २००९ ला कालावधीत राबविलेल्या कन्यादान योजनेंतर्गत लाभार्थींसाठी ५० मंगळसूत्र खरेदी केले. मात्र, लाभार्थ्यांना दोन लाख ९८ हजारांचे मंगळसूत्र वाटप केल्याच्या नोंदी नाहीत, असे अभिलेख्यातून स्पष्ट होते. त्यावरून शैला वळवी यांनी मंगळसूत्र वाटपात अपहार केल्याचा ठपका ठेवला आहे. श्यामराव वागतकर यांनी सन २००५-२००६ मध्ये विशेष साहाय्य योजनेतंर्गत लाभार्थींना एच.डी.पी.व्ही.सी. पाइप पुरवठा योजना राबविली. यााबबत  नागपूर येथील एमआयडीसीकडे ११२० पाइप पुरवठा करण्यासाठी ५ लाख ९३ हजार ६०० रुपये अदा केले. आश्रमशाळांमध्ये पाइप पुरवठ्यात अपहार झाल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. १० सप्टेंबर २००७ रोजी आदिवासी विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यासाठी ६ लाख ६८ हजार मंजूर करण्यात आले. मुंबई येथील प्रवीण मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीला ४ फेब्रवारी २००८ रोजी सायकली वाटप करण्याचे ठरविले. मात्र, सायकली आदिवासी विद्यार्र्थिंंनीना न देता अपहार करण्यात आला. कन्यादान योजनेत मंगळसूत्र, आदिवासी महिला बचतगटाला बकरी व बोकड वाटपात गैरप्रकार करण्यात आल्याचा आरोप आहे.

किनवट पोलिसांत चार जणांसह ठेकेदारांची तक्रार
किनवट प्रकल्पात पाइप, मंगळसूत्र, सायकल, बोकड व बकरी वाटप आणि विद्युतीकरणाच्या कामात गैरप्रकार झाल्याप्रकरणी माजी प्रकल्प अधिकारी श्यामराव वागतकर यांच्यासह निरीक्षक जी.जे. नरवाडे, एम.व्ही. देशमुख, सहायक प्रकल्प अधिकारी एस.पी. उदकवाड यांच्यावर फौजदारी दाखल करण्याबाबत तक्रार नोंदविली आहे. ३० नोव्हेंबर २००७ रोजी ९७ आदिवासी लाभार्थींच्या घरात विद्युतीकरणाचे काम न करता देयके उचलणाºया अमरावती येथील टेक्निकल स्कुल विरूद्ध फौजदारीचा उल्लेख आहे.

मनीषा वर्मा यांची उच्च न्यायालयात सोमवारी साक्ष
‘ट्रायबल’च्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयात घोटाळाप्रकरणी कार्यवाहीबाबत सोमवार, २३ जुलै रोजी साक्ष नोंदवावी लागणार आहे. दोषी वर्ग-१ आणि  वर्ग-२ च्या अधिकाºयांना कारवाईसाठी नोटीस बजावली आहे. आतापर्यंत घोटाळ्यात किती दोषींवर फौजदारी दाखल झाली, याचा लेखाजोखा प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर करावा लागेल. न्यायमूर्ती शंतनु केमकर आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर वर्मा या साक्ष देतील, अशी माहिती आहे.

Web Title: 'Tribal' scam again faces criminal charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.