प्रभारी मुख्याध्यापकासह शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 04:16 PM2017-07-26T16:16:44+5:302017-07-26T16:18:20+5:30

पंचायत समिती अंतर्गत येणाºया जिल्हा परिषद शाळा खोपमार व चोपना येथील शिक्षक वारंवार कोणतिही सूचना न देता गैरहजर राहत होते.

Teachers with HM suspended in Dharni | प्रभारी मुख्याध्यापकासह शिक्षक निलंबित

प्रभारी मुख्याध्यापकासह शिक्षक निलंबित

Next
ठळक मुद्देगैरहजर राहणे भोवलेकेंद्रप्रमुखाची वेतनवाढ रोखली

धारणी (अमरावती): पंचायत समिती अंतर्गत येणाºया जिल्हा परिषद शाळा खोपमार व चोपना येथील शिक्षक वारंवार कोणतिही सूचना न देता गैरहजर राहत होते. याबाबत केलेल्या तक्रारीची चौकशीनंतर प्रभारी मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांना धारणी गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांच्या आदेशावरून निलंबित करण्यात आले आहे.
नवे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर जिल्हापरिषद शाळा खोपमार येथील प्रभारी मुख्याध्यापक आर.एम. कास्देकर हे सतत गैरहजर राहत होते. त्यांनी गावातील एक डीएड झालेला विद्यार्थी शिक्षक म्हणून ठेवला होता. त्याचसोबत जिल्हा परिषद शाळा चोपना येथील सहाय्यक शिक्षक आर.के. खुजरे हे सत्र सुरू झाल्यापासून शाळेत आले नव्हते. या दोन्ही शिक्षकांची तक्रारी स्थानिक पालकांनी केली होती.
यावर गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांनी चौकशी करीत १९ जुलै रोजी शाळेला भेटी दिल्या. यावेळी दोन्ही शाळेतील शिक्षक सतत गैरहजर राहील्याचे निर्दशनास आले. यावरून ही कारवाई करण्यात आली.

केंद्रप्रमुखाची वेतनवाढ रोखली
या दोन्ही शाळा केंद्रप्रमुख एस.बी. पटेल यांच्या कार्यक्षेत्रातील आहेत. या चौकशीदरम्यान केंद्रप्रमुखाचे परीक्षेत्रातील शाळांवर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवण्यात आला शिवाय त्यांचे या दोन्ही शिक्षकांना सहकार्य असल्याचे निदर्शनास आले असून त्यांची वेतनवाढ रोखल्याचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांनी सांगितले. दुसरीकडे खुजरे यांचा पगार नियमित असल्याचे दिसते.

Web Title: Teachers with HM suspended in Dharni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.