राज्यस्तरीय भजन स्पर्धेत वरळी, कोल्हापूर संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:41 PM2019-01-31T13:41:53+5:302019-01-31T13:46:43+5:30

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेत पुरुष गटात वरळी व महिला गटात कोल्हापूर संघ प्रथम ठरला.

In the state-level bhajan competition, Worli, Kolhapur Sangh Ajinkya | राज्यस्तरीय भजन स्पर्धेत वरळी, कोल्हापूर संघ अजिंक्य

राज्यस्तरीय भजन स्पर्धेत वरळी, कोल्हापूर संघ अजिंक्य

Next
ठळक मुद्देराज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेचा समारोप महात्मा गांधी स्मृती पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेत पुरुष गटात वरळी व महिला गटात कोल्हापूर संघ प्रथम ठरला. स्पर्धेत विजयी संघांना स्मृतीचिन्ह व रोख स्वरुपात पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात दोन दिवसीय राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धा २९ व ३० जानेवारी रोजी घेण्यात आली. बुधवारी पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर संजय नरवणे होते. प्रमुख अतिथी बँक आॅफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक मिलिंद घारड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, नियोजन विभागाचे सहआयुक्त कृष्णाजी फिरके, रामेश्वर काकडे, पुरुषोत्तमदास हरवानी, राज्याचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे, सहा. आयुक्त घनश्याम कुळमेथे श्रीकांत धोत्रे, अरुण कापसे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक प्रवीण आळशी, भीमराव भुरे, स्नेहल सिंबेकर हे होते. पुरुष गटात वरळी व महिला गटात कोल्हापूर संघाने प्रथम पुरस्कार प्राप्त केले. उत्कृष्ट भूमिका बजावणाऱ्या कलावंतांना प्रोत्साहनपर बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रल्हाद लोहार (सांगली), नामदेव सपकाळ (नायगाव), पवन पाटील (सोलापूर), किरण चव्हाण (सांगली), गोपाल चौधरी (नागपूर), राजाराम परळ (वरळी), भाऊसी रेपे (कोल्हापूर), सुजित परब (चिपळून), दीपक पडोळे (औरंगाबाद), प्राजक्त परब (चिपळून), वर्षा जोशी (नांदेड), दीपाली शेनवाडे(कोल्हापूर), मधुरा शास्त्री (वरळी), श्रृषिका पिंगळे (अमरावती), प्रियंका भामरे (जळगाव) यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन सुधर्मा खोडे, आभार प्रदर्शन धनश्याम कुळमेथे यांनी केले. कार्यक्रमासाठी सत्यजित चौधरी, रामेश्वर अळणे, सुनील चव्हाण, अजय पांडे, सचिन खारोडे, संतोष कुकडे, हरीश वैद्य, संजय खेन्ते, प्रमोद खडसे यांनी परिश्रम घेतले.

४५० कलावंतांची मांदियाळी
या स्पर्धेत राज्यभरातून भजनी मंडळे सहभागी झाले होते. यामध्ये पुरुष गटात १९ आणि महिला गटात १९ असे ३८ संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघात १२ जणांचा समावेश असल्याने एकूण ४५० भजनी कलावंतांची या स्पर्धेत मांदियाळी होती.

Web Title: In the state-level bhajan competition, Worli, Kolhapur Sangh Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.