‘टीम स्पिरीट’मुळे सिनेट निवडणूक यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 09:49 PM2017-11-06T21:49:11+5:302017-11-06T21:49:34+5:30

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ लागू झाल्यानंतर नवीन कायद्यातील तरतुदीनुसार प्राधिकारिणींच्या निवडणूक घेण्याचे आव्हान होते.

The Senate elections were successful due to 'Team Spirit' | ‘टीम स्पिरीट’मुळे सिनेट निवडणूक यशस्वी

‘टीम स्पिरीट’मुळे सिनेट निवडणूक यशस्वी

Next
ठळक मुद्देकुलगुरूंचे गौरवोद्गार : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कृतज्ञता सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ लागू झाल्यानंतर नवीन कायद्यातील तरतुदीनुसार प्राधिकारिणींच्या निवडणूक घेण्याचे आव्हान होते. अधिकारी व कर्मचाºयांंनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. ‘टीम स्पिरीट’ कार्यामुळेच विद्यापीठाला यशस्वीपणे प्राधिकारिणींच्या निवडणुका घेता आल्यात, असे गौरवोद्वार कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी काढले.
विद्यापीठ प्राधिकारिणींची निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांचा कृतज्ञता सोहळा विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जे.डी. वडते, वित्त व लेखा अधिकारी शशीकांत आस्वले, विद्यापीठ आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशीकांत रोडे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष नितीन कोळी, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर, सहा.कुलसचिव प्रमोद तालन, उमेश लांडगे उपस्थित होते.
कुलगुरुंच्या हस्ते गौरविले
कुलगुरु चांदेकर यांच्या हस्ते कुलसचिव अजय देशमुख यांच्यासह निवडणूक कक्षातील प्रमोद तालन, उमेश लांडगे, अनंत पाटील, निनाद देशपांडे, प्रकाश वगारे, दिलीप भगतपुरे, अशोक काळे व गिरीश पहूरकर, मतदान अधिकारी अविनाश असनारे, व्ही.आर. मालविय, डी.आर. चव्हाण, एस.आर. बंड मंगेश वरखेडे यांचा, जिल्हावार निरीक्षक विलास नांदूरकर, नितीन कोळी, अजय देशमुख, श्रीकांत पाटील, डी.एस. राऊत, जे.डी. वडते, शशीकांत आस्वले, शशीकांत रोडे तसेच मतमोजणी समितीचे अध्यक्ष मनोज तायडे, सदस्य एस.एफ.आर. खाद्री यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: The Senate elections were successful due to 'Team Spirit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.