ग्रामविद्युत व्यवस्थापकांची झेडपीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:33 AM2018-08-21T01:33:28+5:302018-08-21T01:33:41+5:30

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींत विद्युत व्यवस्थापक म्हणून निवड केलेल्यांची नियुक्ती होण्याअगोरच त्यांना अचानक अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या व्यवस्थापकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी सोमवारी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मोराटकर यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर व सीईओ विनय ठमके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Rural Electrotechnist Strikes on ZP | ग्रामविद्युत व्यवस्थापकांची झेडपीवर धडक

ग्रामविद्युत व्यवस्थापकांची झेडपीवर धडक

Next
ठळक मुद्देनिवेदन : नियुक्तीअभावी अपात्र ठरविले; अन्याय दूर करा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींत विद्युत व्यवस्थापक म्हणून निवड केलेल्यांची नियुक्ती होण्याअगोरच त्यांना अचानक अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या व्यवस्थापकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी सोमवारी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मोराटकर यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर व सीईओ विनय ठमके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेतून विद्युत व्यवस्थापक म्हणून निवड झालेल्या आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची नियुक्ती केली. संबंधित उमेदवारांच्या दस्तावेजाची पडताळणी करून ती महावितरणकडे सादर केल्यानंतर ग्रामपंचायतीने विद्युत व्यवस्थापक म्हणून नियुक्तिपत्र दिल्याचे या उमेदवारांचे म्हणणे आहे. अशातच १ सप्टेंबरपासून ग्रामविद्युत व्यवस्थापकांना प्रशिक्षणाबाबतचे वृत्त माध्यमांत झळकले. त्याचवेळी त्यांना अपात्र घोषित करण्यात आल्याचे पत्र पंचायत समितीला प्राप्त झाले. महावितरणच्या या घोळात नियुक्त केलेल्या ग्रामविद्युत व्यवस्थापकांना कुठल्या आधारे अपात्र ठरविण्यात आले, याचा जाब द्यावा व नियुक्तीनंतर केलेला हा अन्याय त्वरित दूर करण्याची मागणी निवेदनाद्वारा करण्यात आली. यावेळी प्रकाश मारोटकर, नीलेश उईके, मंगेश वैद्य, प्रफुल्ल पंधरे, नामदेव चव्हाण, अमर कांबळे, पवन अजमिरे, वैभव मेश्राम, तुषार चौधरी, केशव मासोदकर, विश्वास खानझोडे, नीलेश जंगले, संजय हिरोडे, धनराज सातंगे उपस्थित होते.

Web Title: Rural Electrotechnist Strikes on ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.