संविधान जाळणाऱ्यांविरुद्ध अमरावतीत तीव्र निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:24 PM2018-08-13T22:24:56+5:302018-08-13T22:26:30+5:30

दिल्लीतील जंतरमंतर येथे संविधान प्रत जाळून मुर्दाबाद घोषणा देणाºयांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींनी शहरात प्रचंड निदर्शने केली. इर्विन चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून रोष व्यक्त केला. याशिवाय विविध ठाण्यांतील पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

Rapid demonstrations in Amravati against constitutionalists | संविधान जाळणाऱ्यांविरुद्ध अमरावतीत तीव्र निदर्शने

संविधान जाळणाऱ्यांविरुद्ध अमरावतीत तीव्र निदर्शने

Next
ठळक मुद्देविविध ठिकाणी आंदोलने : इर्विन चौकात प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिल्लीतील जंतरमंतर येथे संविधान प्रत जाळून मुर्दाबाद घोषणा देणाºयांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींनी शहरात प्रचंड निदर्शने केली. इर्विन चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून रोष व्यक्त केला. याशिवाय विविध ठाण्यांतील पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे काही समाजकंटकांनी 'भारतीय संविधानाची प्रत जाळली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह घोषणा दिल्यात. हा सर्व प्रकार कॅमेराबद्ध करून व्हिडीओ देशभरात व्हायरल केला गेला. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याने यावर आक्षेप नोंदवून शहरात विविध संघटनांनी सोमवारी शहरात आंदोलनात्मक पावित्रा घेत घोषणाबाजी व निदर्शने केली. राजकमल चौक व इर्विन चौकातून शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी 'डिटेन' केले. इर्विन चौकात रस्त्यावरच प्रतिकारात्मक पुतळ्याचे दहन करणाऱ्यांना गाडगेनगर पोलिसांनी डिटेन केले. गाडगेनगर पोलिसांनी २१, तर राजकमल चौकात निदर्शने करणाऱ्या ३० जणांना कोतवाली पोलिसांनी 'डिटेन' केले. याशिवाय जिल्ह्याभरातील विविध ठाण्यांत निवेदने देऊन संविधान जाळणाऱ्यांविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला.
इर्विन चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
अनुसूचित जाती-जमाती संविधान बचाव समितीतर्फे अमोल इंगळे, राजेश वानखडे, सुरेश तायडे, मनोज वानखडे, गौतम मोहोड, अश्विन उके, प्रवीण बन्सोड, राहुल भालेराव, संजय आठवले, मनोज मेश्राम, प्रशांत वाकोडे, किशोर सरदार, संजय थोरात, जितू रौराळे, अतुल चौरे, नितीन काळे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. संविधान जाळणाऱ्यांना तातडीने अटक करा, अन्यथा १७ आॅगस्टला जिल्हा बंदचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिला. आंदोलनकर्त्यांनी इर्विन चौकात सरकारचा प्रतिकारात्मक पुतळा जाळला.
भीम आर्मीकडून मनुस्मृतीचे दहन
भीम आर्मी संघटना व भारत एकता मिशनतर्फे इर्विन चौकात मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. संविधान जाळणाऱ्यांना अटक देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा व त्यांना फाशी द्या, अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी गाडगेनगर पोलिसांनी बंटी रामटेके, सुदाम बोरकर, प्रवीण बन्सोड, गौतम हिरे, सुरेंद्र काळे, कमलेश दंडाळे यांना डिटेन केले. तत्पूर्वी आंदोलनात मनीष साठे, शेख अकबर भाई, साजीद अली, राहुल ढोके, संदीप चव्हाण, अभिजित गोंडाणे, नितीन काळे, शुभम ढोके आदींचा सहभाग होता.
जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दिल्लीत संविधान जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सोमवारी जिजाऊ ब्रिगेडने जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली. याप्रकरणी त्वरित तपास करून दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा जिजाऊ ब्रिगेड राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीला पाटील, मार्गदर्शक मयुरा देशमुख, कीर्तीमाला चौधरी, तेजस्विनी वानखडे आदींनी दिला.
प्रहार आक्रमक
संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी प्रहारने जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात जोगेंद्र मोहोड, सुधीर उगले, पिंटू सोळंके, नीलेश ठाकूर, चंदू उगले, इम्तियाज अहमद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Rapid demonstrations in Amravati against constitutionalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.