राजुराबाजारमध्ये ‘किसनी’चा तिसरा दिवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:29 PM2019-03-24T22:29:04+5:302019-03-24T22:29:41+5:30

साधारणत: अविवाहित व्यक्ती किंवा बालकाच्या मृत्यूनंतर तेरवी न करता तिसरा दिवस केला जातो. मात्र, तालुक्यातील राजुराबाजार येथे एका कुत्रीचा तिसरा दिवस करण्यात आला. तिचेवर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकसंदेशाच्या पत्रिका वाटण्यात आल्या. किसनी नावाच्या या कुत्रीचा ग्रामस्थांनी केलेला तिसरा दिवस सर्वार्थाने कुतुहलाचा ठरला.

Rajuri market 'Kisini' third day! | राजुराबाजारमध्ये ‘किसनी’चा तिसरा दिवस !

राजुराबाजारमध्ये ‘किसनी’चा तिसरा दिवस !

Next
ठळक मुद्देग्रामस्थांची भूतदया : पंचक्रोशीत चर्चा, सामूहिक श्रद्धांजली वाहिली

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : साधारणत: अविवाहित व्यक्ती किंवा बालकाच्या मृत्यूनंतर तेरवी न करता तिसरा दिवस केला जातो. मात्र, तालुक्यातील राजुराबाजार येथे एका कुत्रीचा तिसरा दिवस करण्यात आला. तिचेवर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकसंदेशाच्या पत्रिका वाटण्यात आल्या. किसनी नावाच्या या कुत्रीचा ग्रामस्थांनी केलेला तिसरा दिवस सर्वार्थाने कुतुहलाचा ठरला.
काही वर्षांपासून राजुराबाजार येथील बाजारात मुक्तपणे विहारणारी किसनी सर्वांच्या गळयातील ताईत होती. बाजारात दुकानांची ती संरक्षक होती. २१ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला अन् अनेकांचे डोळे पाणावले. तिचे पार्थिव तिरडीवर ठेऊन ग्रामस्थांनी खांदा दिला. कुणी आगटे धरले. वाजतगाजत स्मशानात तिला मुठमाती दिली. ग्रामस्थांची भूतदया तेवढ्यावरच थांबली नाही. तर व्यक्तीच्या मृत्यूनंतर शोकसंदेश पत्रिका वाटण्यात येतात; तशाच किसनीच्या तिसऱ्या दिवसाची पत्रिका गावात वितरीत के ल्यात.
दादाजी दरबारमध्ये भोजन
बाजार मार्केंटिंग येथील किसनी नामक कुत्रीचा रविवार २४ मार्च रोजी तिसरा दिवस करण्यात आला. राजुराबाजार येथील चिंचरगव्हाण पुनर्वसनातील दादाजी दरबार या स्थळी हा कार्यक्रम पार पडला. सामुहिक वर्गणीतून भोजन देण्यात आले. तर उपस्थित ग्रामस्थांनी किस्नीला श्रध्दांजली वाहिली.

Web Title: Rajuri market 'Kisini' third day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.