जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:12 PM2018-07-11T22:12:52+5:302018-07-11T22:13:16+5:30

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ज्या नद्यांमुळे धरणाची पातळी वाढते, त्या ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.

The project in the district is thirsty | जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

Next
ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ज्या नद्यांमुळे धरणाची पातळी वाढते, त्या ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये आतापर्यंत शहानूर मध्यम प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ३१.३९ टक्के दलघमी उपयुक्त पाणीसाठा हा धरणात शिल्लक आहे, तर चंद्रभागा मध्यम प्रकल्पात ३२.७३ टक्के, पूर्णा प्रकल्पात ३१.३२ टक्के, सपन प्रकल्पात ३१.९४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावती शहराची तहान भागविणारा ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यस्थितीत ३५ .८५ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शंभर टक्के धरण भरण्याची प्रशासनाला व नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे. हीच परिस्थिती विभागातील अनेक जिल्ह्यातील प्रकल्पाची आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अधिकृत विवरण पत्रात ६ जुलैपर्यंतची सदर माहिती असून, अप्पर वर्धा धरण परिसरात १ जूनपासून आतापर्यंत २४१.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १२४.० मिमी पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत चांगल्या पावसाची नोंद झाली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

९ जुलैपर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडा चांगला पाऊस पडला. पण, धरण परिसरात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. काही दिवसांत जलसाठ्याची पातळी वाढण्याचा विश्वास आहे.
- रमेश ढवळे
अधीक्षक अभियंता.

Web Title: The project in the district is thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.