खासगी ११ शिकवणी वर्ग सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:37 AM2019-06-13T01:37:22+5:302019-06-13T01:37:58+5:30

नोटीस बजावल्यावरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमानुसार अगिनशमन यंत्रणा न उभारणारे ११ खासगी शिकवणी वर्ग बुधवारी महापालिकेच्या पथकाने सील केलेत. सहायक उपायुक्त योगेश पिठे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

Private 11 Teaching Class Seal | खासगी ११ शिकवणी वर्ग सील

खासगी ११ शिकवणी वर्ग सील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नोटीस बजावल्यावरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमानुसार अगिनशमन यंत्रणा न उभारणारे ११ खासगी शिकवणी वर्ग बुधवारी महापालिकेच्या पथकाने सील केलेत. सहायक उपायुक्त योगेश पिठे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. ती निरंतर सुरू राहणार असल्याचे उपायुक्त महेश देशमुख यांनी सांगितले.
आकाश शिकवणी वर्ग, सिव्हिल इंजिनीअरिंग कॅड सेंटर, मेंटॉर, सी.ए.डी.डी. सेंटर, सी.सी.आय.टी, उडान सायन्स अ‍ॅकेडमी, राजेश येवले शिकवणी वर्ग, राठी सर शिकवणी वर्ग, भोजने सर शिकवणी वर्ग यांसह अन्य ठिकाणी नियमानुसार अग्निशमन यंत्रणा नसल्याने सील करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
सुरत येथील घटनेनंतर सहा सदस्यांची समिती स्थापन करून शहरातील सर्व खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांच्या सरुक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आहेत काय, याविषयीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले होते. पथकाद्वारे पाहणीत फक्त १७ क्लासेसची अधिकृत नोंदणी असल्याचे आणि सर्वत्र महाराष्ट्र अग्निरोधक आणि जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ च्या अनुषंगाने उपाययोजना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या खासगी शिकवणी वर्गांना महापालिकेद्वारा नोटीस बजावून सात दिवसांची व सील करण्याच्या अगोदर पुन्हा दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती.
नोटीस बजावल्यानंतरही दिरंगाई करण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच क्लासेसला सील ठोकण्यात आले. हे सील महापालिकेच्या परवानगीशिवाय उघडता येणार नाही, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी बजावले. या कारवाईमध्ये सहायक आयुक्त (मुख्यालय) योगेश पिठे, सहायक आयुक्त (बाजार व परवाना) श्रीकांत चव्हाण, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, सुनील पकडे, अग्निशमन विभागाचे कृती दलप्रमुख संतोष केंद्रे, सदस्य अमित ददगाळ, गौरव दंदे, गोविंद घुले, बाजार व परवाना विभागाचे निरीक्षक उदय चव्हाण, अमर सिरवाणी, रूपेश गोलाईत, प्रदीप झंझाळ तसेच अतिक्रमण निर्मूलन व पोलीस कर्मचारी सहभागी होते.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांसंदर्भात सर्व क्लासेसना नोटीस बजावून संधी दिली. मात्र, दुर्लक्ष केल्याने कारवाई करण्यात आली. सुरत येथील घटनेनंतर अनेक पालकांनी या बाबीकडे लक्ष वेधले होते. - संजय निपाणे, आयुक्त, महापालिका

Web Title: Private 11 Teaching Class Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग