महापालिकेत घरकु लाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी

By admin | Published: May 9, 2014 12:55 AM2014-05-09T00:55:52+5:302014-05-09T01:42:08+5:30

७१३ घरकुलांचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील १२७२ घरकुलांचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने तयारी चालविली आहे.

Preparation for the second phase of Barkhu Lala in Municipal Corporation | महापालिकेत घरकु लाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी

महापालिकेत घरकु लाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी

Next

अमरावती : ७१३ घरकुलांचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील १२७२ घरकुलांचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने तयारी चालविली आहे. यामध्ये प्रारंभी ३५0 लाभार्थ्यांना धनादेश वितरीत केले जाणार असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, नवबौध्द घटकासांठी घरकुलांची योजना सुरू करण्यात आली. झोपडीऐवजी हक्काचे पक्के घर मिळावे, ही शासनाची संकल्पना आहे. त्यानुसार या योजनेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. पहिल्या टप्प्यात दारिद्रय़रेषेखालील विधवा, घटस्फोटिता, परित्यक्तांना प्राधान्य देण्यात आले. ७१३ घरकुलांची निर्मिती करण्यात आली. मात्र, पात्र असतानाही दारिद्रय़ रेषेखालील कार्ड नसल्याने त्या योजनेपासून वंचित आहेत. घरकुलाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी २५.४४ कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला.
या निधीतून लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची तयारी आहे. काही लाभार्थ्यांचे धनादेश तयार असून ते लवकरच त्यांना वितरीत केले जातील.
- अरुण डोंगरे, आयुक्त, महापालिका

Web Title: Preparation for the second phase of Barkhu Lala in Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.