दोन टप्प्यांत होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:09 PM2019-03-11T23:09:21+5:302019-03-11T23:10:20+5:30

जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. सहा विधानसभा मतदारसंघांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलला, तर जिल्ह्यातीलच दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Polling will take place in two stages | दोन टप्प्यांत होणार मतदान

दोन टप्प्यांत होणार मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. सहा विधानसभा मतदारसंघांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलला, तर जिल्ह्यातीलच दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील २४ लाख ६ हजार ६१९ मतदार २६०७ केंद्रावर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पत्रपरिषदेत दिली.
अमरावती मतदारसंघात १८ लाख १२ हजार ४४८ मतदार आहेत. यापैकी ९ लाख ३५ हजार पुरुष,८ लाख ७७ हजार ३२२ स्त्री मतदार व ३६ तृतीयपुरुषी मतदार आहेत. वर्धा मतदारसंघात समाविष्ट धामणगाव व मोर्शी विधानसभा मतदारसंघांमध्ये ५ लाख ९४ हजार १७१ मतदार आहेत. यापैकी ३ लाख ५ हजार ५ पुरुष, २ लाख ८९ हजार १५९ स्त्री व सात मतदार तृतीयपुरुषी आहेत. मतदार नोंदणीच्या विशेष अभियानात ११ हजार २०५ मतदारांनी अर्ज दाखल केले . जिल्ह्यात एकूण २६०७ मतदान केंद्रांपैकी १९२६ केंदे्र अमरावती लोकसभा मतदारसंघात, तर ६८१ केंद्रे वर्धा मतदारसंघात आहेत. याव्यतिरिक्त ८८ प्रस्तावित साहाय्यकारी मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघात ७४ व वर्धा लोकसभेत १४ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. पत्रपरिषदेला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शरद पाटील उपस्थित होते.
२० हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता
जिल्ह्यातील एकूण २६०७ मतदान केंद्रांसाठी ३३६९ मतदान पथके लागणार आहेत. यामध्ये ३३६९ मतदान केंद्राध्यक्षांसह १३ हजार ४७६ मतदान कर्मचारी लागणार आहे. या निवडणूक कामाकरिता एकूण १९ हजार ५२६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियोजन आहे. याव्यतिरिक्त २४२ झोनल अधिकारी, १२४ फिरती पथके, १२४ स्टॅटिक्स सर्व्हिलान्स टीम, १८ व्हिडीओ व्हिविंग टीम, ३८ व्हिडीओ एक्स्पेंडिचर टीम व ६६ इलेक्शन एक्स्पेंडिचर टीम लागणार आहेत.
नेमानी गोडाऊनमध्ये मतमोजणी
अमरावती मतदारसंघाची मतमोजणी नेमाणी गोडाऊन येथे होणार आहे. याच ठिकाणी स्ट्राँग रूम राहील. या निवडणुकीसंदर्भात मतदारांसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक राहणार आहे. आतापर्यंत या क्रमांकाच्या माध्यमातून ३८३ मतदारांच्या समस्या सोडविण्यात आलेल्या आहेत.
प्रत्येक केंद्रावर शेड
मतदानाच्या काळात उन्हाळा चांगलाच तापणार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर शेड व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी सांगितले.
असा आहे बदल
यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन राहणार आहे. याद्वारे मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याची पाहणी वैयक्तिक करता येणार आहे. याव्यतिरिक्त उमेदवारांच्या २६ क्रमांकाच्या शपथपत्रात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
३९ मतदान केंदे्र अतिसंवेदनशील
जिल्ह्यातील ३९ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. याठिकाणी जादा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. निवडणूक निरीक्षक व सूक्ष्म निरीक्षक उपस्थित राहणार आहेत.

अमरावती, वर्धा
निवडणूक कार्यक्रम
तपशील वर्धा अमरावती

अधिसूचना १८ मार्च १९ मार्च
अर्ज दाखल २५ मार्च २६ मार्च
छाननी २६ मार्च २७ मार्च
माघार २८ मार्च २९ मार्च
मतदान ११ एप्रिल १८ एप्रिल
मतमोजणी २७ मे २७ मे

81 हजारांनी वाढली मतदारसंख्या

मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारसंख्या ८१ हजारांनी वाढली आहे. सन २०१४ मधील निवडणुकीत ३१ लाख ४० हजार ७९१ मतदार होते, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

Web Title: Polling will take place in two stages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.