निंभोरा लाहे येथे तीन हेक्टरमध्ये झाडे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:27 PM2019-05-20T22:27:20+5:302019-05-20T22:27:40+5:30

नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा प्रयत्न केला असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.

Plantation of trees in three hectares at Nimhora Lahe | निंभोरा लाहे येथे तीन हेक्टरमध्ये झाडे खाक

निंभोरा लाहे येथे तीन हेक्टरमध्ये झाडे खाक

Next
ठळक मुद्देसामाजिक वनीकरणाचे दुर्लक्ष : साडे तीन हजार झाडे जळाली; पाच ते सहा लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा प्रयत्न केला असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.
गतवर्षी जुलै महिन्यात निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने ८ ते १० हेक्टर परिसरात वृक्ष लागवड मोहिम राबविली. वर्षभरात ही रोपे तीन फुटापर्यंत पोहचली. दरम्यान तीन हेक्टरमध्ये वृक्ष लागवडीचे रोपे बहरली. ही रोपे जगविण्यासाठी सामाजिक वनीकरणाने प्रयत्न सुद्धा केले. तथापि, रोपे तीन फूट उंचीचे आणि गवत पाच फुटांच्यावर पोहचले. त्यामुळे रविवारी अचानक लागलेल्या आगीमुळे गवतासह तीन फुट लांबीचे झाडे जळून खाक झाली. ज्यावेळी सामाजिक वनीकरणाच्या वृक्ष लागवडीचे रोपे जळत होती, त्यावेळी सामाजिक वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी नव्हते, असे प्रत्यक्षदर्शनींचे म्हणने आहे. काही ग्रामस्थांनी जंगलात आग लागल्याची माहिती बडनेरा येथील महापालिका झोन कार्यालयाला दिली. त्यानंतर अग्निशमनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. परंतु, आग नियंत्रणात येईस्तोवर सामजिक वनीकरणाची झाडे गवतासह जळून खाक झाली होती. महापालिका अग्निशमन कर्मचाऱ्यांनी बंबाद्वारे आग विझविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. जिवंत झाडांभोवती गवत वाढले असताना ते काढण्यात आले नाही. त्यामुळे गवतासह लाखो रुपयांची झाडेसुद्धा आगीचे लक्ष्य ठरली.

साडे तीन हजार झाडे जळाल्याचा अंदाज आहे. ही झाडे १०० टक्के जगली होती. मात्र, आग कोणी, कशाने लागली, हे कळू शकले नाही. या आगीत पाच ते सहा लाख रूपयांची झाडे जळून खाक झाली आहे. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे.
- डी.बी. पवार
आरएफओ, वनीकरण

सामाजिक वनीकरणाने झाडांची काळजी घेतली नाही. त्यामुळे आगीत हिरवेगार तीन फुटापर्यंतची झाडे जळून खाक झाली. आग लागत असताना वनकर्मचारी कोणीही उपस्थित नव्हते. वेळीच दखल घेतली असती तर हिरवेगार झाडे वाचविता आले असते.
- गणेश ढोरे
ग्रामस्थ, निंभोरा लाहे.

Web Title: Plantation of trees in three hectares at Nimhora Lahe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.