पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:55 PM2018-05-25T22:55:21+5:302018-05-25T22:55:38+5:30

केंद्रातील भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सातत्याने पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ होत असून, सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घातला जात आहे. इंधन दरवाढ म्हणजे चोरट्या मार्गाने करवसुली असल्याचे सांगत शिवसेनेने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आक्रोश व्यक्त केला. सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी घोड्यावर स्वार होऊन इंधन दरवाढीकडे प्रशासनाने लक्ष वेधले, हे विशेष.

Petrol and diesel price hike | पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आक्रोश

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आक्रोश

Next
ठळक मुद्देशिवसेनेची जिल्हा कचेरीवर धडक : घोड्यावर स्वार होऊन केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्रातील भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सातत्याने पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ होत असून, सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घातला जात आहे. इंधन दरवाढ म्हणजे चोरट्या मार्गाने करवसुली असल्याचे सांगत शिवसेनेने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आक्रोश व्यक्त केला. सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी घोड्यावर स्वार होऊन इंधन दरवाढीकडे प्रशासनाने लक्ष वेधले, हे विशेष.
शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्थानिक बियाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी अमोल निस्ताने, आशिष धर्माळे, उमेश घुरडे, संजय पडसोदकर व स्वराज ठाकरे आदींनी घोड्यावर स्वार होऊन केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला व जिल्हाधिक ाºयांना निवेदन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित केंद्रात सरकार स्थापन केले. मात्र, गत चार वर्षात इंधन दरवाढ ही विक्रमी ठरली. इंधन दरवाढीमुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, मजूर, महिला वर्ग, व्यापारी यांच्याकडून पठाणी वसुली करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढ तत्काळ येत्या तीन दिवसात रद्द करावी, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला. यावेळी माजी आ. संजय बंड, नाना नागमोते, अमोल निस्ताने, शाम देशमुख, आशिष धर्माळे, उमेश घुरडे, प्रवीण अडसपुरे, दीपक मदनेकर, मंगेश गाले, राहूल माटोळे, प्रवीण दिघाते, स्वराज अवघड, शाम कुचे, निलेश जामठे, सचिन उमक, प्रशांत दळवी, विजय घोंगळे, संजय देवकर, समाधान देशमुख, संजय कोलटेके, छत्रपती पटके, अजय बंड आदी उपस्थित होते.

Web Title: Petrol and diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.