स्थायी सभापतिपदाची सूत्रे महिलेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:17 AM2018-01-24T00:17:08+5:302018-01-24T00:17:44+5:30

महापालिकेची तिजोरीची चावी अर्थात स्थायी समितीचे सुकाणू परंपरागतरित्या पुरुष नगरसेवकाकडे न देता ती जबाबदारी महिला सदस्याकडे सोपविण्याबाबत भाजपच्या अंतस्थ गोटात कमालीचे चिंतन सुरु आहे.

Permanent chairmanship of women | स्थायी सभापतिपदाची सूत्रे महिलेकडे

स्थायी सभापतिपदाची सूत्रे महिलेकडे

Next
ठळक मुद्देनगरसेविका तिजोरी सांभाळणार : कल्पक प्रयोगशीलता ,भाजपच्या अंतर्गत गोटात विचारमंथन

प्रदीप भाकरे।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिकेची तिजोरीची चावी अर्थात स्थायी समितीचे सुकाणू परंपरागतरित्या पुरुष नगरसेवकाकडे न देता ती जबाबदारी महिला सदस्याकडे सोपविण्याबाबत भाजपच्या अंतस्थ गोटात कमालीचे चिंतन सुरु आहे. स्थायी समिती सभापतीपदी महिला सदस्याची निवड झाल्यास तो महापालिकेसाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. पालिकेच्या रजतमहोत्सवी वर्षात तो पहिलावहिला कल्पक प्रयोग आपणच साकारायचा , याबाबत भाजपमधील एक सुज्ञ गटामध्ये विचारमंथन सुरु झाले आहे. महापालिकेची तिजोरी सांभाळण्यासाठी भाजपमध्ये कोण नगरसेविका अधिक प्रबळ ठरु शकेल, याची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. १६ सदस्यीय स्थायीच्या सभागृहात भाजपकडे ९ सदस्य असल्याने सभापतीपद भाजपच्याच पारड्यात पडणार आहे.
१६ मार्च २०१७ रोजी विद्यमान स्थायी सभापती तुषार भारतिय यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने भाजपमध्ये हे महत्वपुर्ण पद मिळविण्यासाठी मोठी अहमहमिका लागली आहे. नेहमीप्रमाणे हे पद आपल्याच वाटयाला येईल, या भूमिकेतून आपआपल्या गॉडफादर करवी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न जोरकसपणे होऊ लागला आहे.‘ पद एक नि इच्छूक अनेक ’ अशी परिस्थिती ओढविल्याने ‘कुरबुरी टाळण्यासाठी महिला सभापतीच्या कल्पक प्रयोगाने जन्म घेतला आहे. भाजपमध्ये डझनापेक्षाही अधिक सदस्य स्थायी सभापती बनण्यासाठी बाशिंग बांधून तयार असल्याने भाजपमध्ये महिला सभापतीपदाची कल्पक खेळी रचली जात असल्याची माहिती भाजपच्या एका स्थानिक नेत्याने दिली आहे. तसे झाल्यास स्थानिक भाजपमधील अंतर्गत बेबनाव जगजाहिर होणार नाही, अशी त्यामागील मनोभूमिका असल्याचे ते म्हणाले.
स्थायी सभापतीच महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करतात. महापौर आणि उपमहापौरांप्रमाणे या पदाला महापालिकेत ‘वेटेज’ आहे. आमसभा आणि आयुक्तांप्रमाणे स्थायी समिती हे स्वतंत्र प्राधीकरण आहे. तथापि या महत्वपुर्ण पदावर अद्यापही महिला विराजमान होऊ शकलेली नाही. १९८३ ला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत सर्वच पुरुष सदस्यांनी स्थायी समिती सभापतीपद भुषविले. महापौर आणि उपमहापौर पदावर विराजमान होऊन अर्धा डझन महिला सदस्यांनी ‘हम भी कुछ कम नही’ हे दर्शवून दिले आहे. तथापि स्थायी समिती सभापतीपदासाठी महिला सदस्याचा मागील २५ वर्षात कधीही साधा विचारही झाला नाही. घरातील अर्थमंत्री म्हणून चोख कामगिरी बजावणाºया महिला सदस्याला तिजोरी सांभाळता येईल का? तिला अर्थसंकल्प मांडता येईल का ? यात सभापतीपदाचे स्वप्न आतापर्यंत साकार झाले नाही. तो योेग यंदा साधण्याची कल्पना भाजपार्इंना सुचली आहे.

भाजपकडून स्त्री सन्मानाचा पुरस्कार
महापालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात ४५ महिला सदस्य आहेत. त्यात भाजपच्या २६ नगरसेविका आहेत. उपमहापौरपदी संध्या टिकले यांच्यासह अन्य विषय समिती सभापतीपदाची सुत्रे महिला सदस्यांकडे देऊन भाजपने स्त्री सन्मानाचा आदर्श घालून दिला आहे.अपवाद केवळ स्थायी समिती सभापतीचा. यंदा ही सुत्रे महिला सदस्याकडे देऊन काही मोजक्या महापालिकेत रांगेत जाऊन बसण्याच्या संकल्पापर्यंत भाजपमधील परिपक्व राजकारणी पोहोचली आहे.

या आहेत भाजपच्या नगरसेविका
४५ सदस्यीय भाजपमध्ये २६ महिला नगरसेवक आहेत. यात सुचिता बिरे, वंदना मडघे, सुरेखा लुंगारे, प्रमिला जाधव, स्वाती जावरे, नीता राऊत, माधुरी ठाकरे, कुसुम साहू, सोनाली करेसिया, सोनाली नाईक,रिता पडोळे, पंचफुला चव्हान, संध्या टिकले, राधा कुरिल, नुतन भुजाडे, जयश्री डहाके,लविना हर्षे, स्वाती कुळकर्णी, संगिता बुरंगे, इंदू सावरकर, सुनंदा खरड, अनिता राज, पद्मा कौंडण्य ,रेखा भुतडा, वंदना हरणे, गंगा अंभोरे यांचा समावेश आहे. खरड, टिकले, साहू, हरणे, कुरिल या भाजपमध्ये ज्येष्ठ सदस्य आहेत.

Web Title: Permanent chairmanship of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.