झेडपीच्या दीड हजार शाळांना चार महिन्यांपासून दमडीही नाही, कामे करायची तरी कशी?

By जितेंद्र दखने | Published: November 2, 2023 05:32 PM2023-11-02T17:32:24+5:302023-11-02T17:36:10+5:30

मुख्याध्यापक, शिक्षकांवर आर्थिक भूर्दंड

One and a half thousand schools of ZP do not have enough money for four months, how can they do the work? | झेडपीच्या दीड हजार शाळांना चार महिन्यांपासून दमडीही नाही, कामे करायची तरी कशी?

झेडपीच्या दीड हजार शाळांना चार महिन्यांपासून दमडीही नाही, कामे करायची तरी कशी?

अमरावती :जिल्हा परिषद शाळा ३०जूनला पासुन सुरु झाल्या आहेत. परंतु गत चार महीन्यापासून जिल्हाभरातील एक रूपयाचे अनुदान शाळांना मिळाले नाही. त्यामुळे दिड हजारावर शाळा गत चार महिन्यापासून आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत.अनुदान नसल्यामुरूळे शाळेचा हा सर्व आर्थिक भूर्दंड मुख्याध्यापक,शिक्षक यांच्यावर पडत आहे.

जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू होवून चार महीन्याचा कालावधी लोटून गेला आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार ५७० शाळांना अद्यापपर्यत शाळांना कुठल्याची प्रकारचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. वर्षभर शाळेचा खर्च भागविण्यासाठी शासनाकडून ४ टक्के सादील व समग्र शिक्षा अभियान मधून अनुदान दिले जात होते. 

या अगोदर सर्व शिक्षा अभियानातून शाळा अनुदान ५ ते १० हजार,शाळा देखभाल दुरुस्तीसाठी, ७ ते १५ हजार आणि शिक्षक अनुदान १००० हजार रुपये मिळत होते. या मधुन शाळेचा खर्च भागवला जात होता. परंतु गत वर्षापासुन हा निधी समग्र शिक्षा अभियान मधून शाळाच अनुदान दिले जात आहे. ते सुद्धा शाळेच्या पटसंख्येवर आधारीत दिले जात होते. अशातच चालू शैक्षणिक सत्रातील चार महीने लोटून गेले. तरीही जिल्हातील १५७९ झेडपी शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहे.शासनाने शिक्षकाकडे अशैक्षणिक कामे सोपवू नये,शाळांना मिळणारे अनुदान वेळेत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत,राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर व पदाधिकारी यांनी केली आहे.

तालुकानिहाय शाळांची संख्या

अचलपूर १२८, अमरावती ११२, अंजनगाव सुजी ८७, भातकुली ११०, चांदूर बाजार १२१, चांदूर रेल्वे ६८, चिखलदरा १६३, दर्यापूर १२९, धामनगांव रेल्वे ८३, धारणी १७०, मोर्शी १०२, नांदगाव खंडेश्र्वर १२४, तिवसा ७६, वरूड १०६ एकूण १५७९

Web Title: One and a half thousand schools of ZP do not have enough money for four months, how can they do the work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.