आता एसटीचेही कळणार लोकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:07 PM2018-05-27T23:07:46+5:302018-05-27T23:07:46+5:30

एसटीची फेरी नेमकी किती वाजता येणार त्याचा अंदाज नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. बसची वाट पाहत वेळ केल्यास प्रवासी अन्य वाहतूक सेवेकडे वळतो. यावर तोडगा काढला जाणार आहे.

Now ST will know the location | आता एसटीचेही कळणार लोकेशन

आता एसटीचेही कळणार लोकेशन

Next
ठळक मुद्देदिवाळीपासून अंमलबजावणी : मोबाईल अ‍ॅपचा होणार वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एसटीची फेरी नेमकी किती वाजता येणार त्याचा अंदाज नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. बसची वाट पाहत वेळ केल्यास प्रवासी अन्य वाहतूक सेवेकडे वळतो. यावर तोडगा काढला जाणार आहे. एसटी गाड्यांमध्ये महामंडळातर्फे व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) अंतर्भूत केली जाणार आहे.
दिवाळीपासून या योजनेचा शुभारंभ होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार असून, एसटीचा प्रवासीदेखील येत्या काही महिन्यात हायटेक होणार आहे. ग्रामीण भागात लाल धुरळा उडवत जाणारी एसटी बस म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. या सेवेमुळे गाव,वाडया, वस्ती तांडा जोडला जाऊन ग्रामीण भागाचे तसेच शहरवासीयांचे जीवन एसटी सेवेशी निगडित आहे. लांब पल्ल्याचा प्रवास असो अथवा जवळचा प्रवास असो सर्वसामान्य प्रवासी एसटीला प्रथम प्राधान्य देत असल्याने या सेवेमध्ये बदल अपेक्षित आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून एसटी सेवेत अनेक महत्त्वपूर्ण आमूलाग्र बदल व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रवाशांना सुखकर सेवा देण्याकरिता प्रशासन कटिबद्ध झाले आहे. त्याचाच परिपाक म्हणून एसटीच्या सेवेमध्ये शिवशाहीेसारख्या गाड्या प्रत्येक आगारांमध्ये दाखल होऊन ही सेवा दिली जात आहे. बहुतांश प्रवासी इच्छित स्थळी प्रवास करीत असताना लोकल मेल एक्स्प्रेस यासारख्या वाहतुकीच्या साधनाने प्रवास करीत असतात परंतु या गाड्या वेळेत किंवा उशिरा येत असल्याची माहितीचे प्रसारण लगेचच मोबाईलवर वा प्लॅटफॉर्मवर मिळते. पण बेस्ट, वा एसटी सेवेत ही मोठी उणीव जाणवत होती. एसटीसाठी बस थांब्यावर बरयाचवेळा प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना ताटकळत उभी राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

आगारात इलेक्ट्रॉनिक्स फलक
प्रवाशांना बसचा ठावठिकाणा कळावा यासाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. त्या जोडीलाच आगारांमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्डाचा वापर करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित असणारी ही प्रणाली सेवेत आणण्यासाठी मागील वर्षी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यात निवड झालेल्या कंपनीने एसटीच्या सेवेचा आढावा घेतला आहे. त्याची सुरुवात दिवाळीदरम्यान होणार आहे.

Web Title: Now ST will know the location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.