- आता मेळघाटात अननस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:57 PM2018-01-01T22:57:49+5:302018-01-01T22:58:43+5:30

मेळघाटातील आदिवासी शेतकºयांसाठी अमरावतीच्या श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाने अननस हे नगदी पीक उपलब्ध केले आहे.

- Now pineapple in Melghat | - आता मेळघाटात अननस

- आता मेळघाटात अननस

Next
ठळक मुद्दे‘शिवाजी उद्यानविद्या’ महाविद्यालयाचे यश वर्षभºयात लागली फळे, पथदर्शी प्रकल्प

आॅनलाईन लोकमत
अमरावती : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी अमरावतीच्या श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाने अननस हे नगदी पीक उपलब्ध केले आहे. चिखलदरा तालुक्यात मोथा येथे गजानन शनवारे यांच्या शेतात पथदर्शी स्वरूपात लघू संशोधन प्रकल्प अंतर्गत अननस लागवड करण्यात आली. एका वर्षात त्याला फळे लागली आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय व ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाटात यापूर्वी स्ट्रॉबेरी संशोधन प्रकल्प यशस्वी ठरला. या संशोधनामुळे हुरूप चढलेल्या जिल्हा नावीन्यता परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाचा नियोजन विभाग यांनी येथील सुमारे ५० शेतकऱ्यांच्या शेतावर स्ट्रॉबेरी लागवड पथदर्शी प्रकल्प राबविला.
संशोधनाला आले फळ
सन २०१६-१७ मध्ये महाविद्यालयाने अननस संशोधन प्रकल्पावर काम सुरू केले. केरळमधून रोपे आणण्यात येऊन मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मोथा येथील शनवारे यांच्या शेतात लागवड करण्यात आली. आता नोव्हेंबर-डिसेंबरपासून या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे. संशोधन प्रकल्प राबविण्याकरिता प्राचार्य शशांक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनप्रमुख नीलेश फुटाणे, अतुल बोंडे, प्रहेश देशमुख आदी हा प्रकल्प राबवित आहेत.
केरळच्या रोपांची गतवर्षी लागवड
मागील वर्षी केरळ येथून मॉरिशस व क्यू जातीच्या वाणाची रोपे आणण्यात येऊन लागवड करण्यात आली होती. उद्यानविद्या महाविद्यालयाच्या शास्त्रशुद्ध मागदर्र्शनामुळे वर्षभरात फळे लागली आहेत. अननसावरील संशोधन प्रकल्पामुळे मेळघाटातील शेतकऱ्यांना नगदी पिकाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रोजगारासाठी परप्रांतात स्थलांतर थांबणार आहे.

Web Title: - Now pineapple in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.