सर विश्र्वश्र्वरैया यांचे विचार काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 09:58 PM2017-09-15T21:58:36+5:302017-09-15T21:59:14+5:30

भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्र्वश्र्वरैया यांनी अभियंता म्हणून जे काम आपल्या आयुष्यात केले.

The need of the hour is the need of Sir Vishwaswaraiya | सर विश्र्वश्र्वरैया यांचे विचार काळाची गरज

सर विश्र्वश्र्वरैया यांचे विचार काळाची गरज

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : अभियंता दिनी सी.बी. पाटील यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्र्वश्र्वरैया यांनी अभियंता म्हणून जे काम आपल्या आयुष्यात केले. ते सर्व अभियंत्याना प्रेरणादायी आहेत. त्याचे विचार अभियंता म्हणून काम करतांना नवी दिशा देणार असून ते सर्वानी अंगीकारण्याची आज खरी गरज असल्याचे प्रतिपादन पतंप्रधान ग्राम सडक योजना विभागाचे अधिक्षक अभियंता सी.बी. पाटील यांनी केले. ते शुक्रवारी जिल्हा परिषद अभियंता संघटना व मित्र परीवाराच्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित अभियंता दिनाचे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी सीईओ के.एम. अहमद होते.कार्यकारी अभियंता राजेंद्र डोंगरे,संजय येवले, के.टी. उमाळकर,विशाल जवंजाळ,अरविंद गावंडे,संजय व्यवहारे,प्रमोद तलवारेआदी उपस्थित होते. पुढे बोलतांना पाटील म्हणालेत.अभियंत्याचे दैवत मोक्षगुंडम सर विश्र्वश्र्वरैया यांच्या कार्याची प्रेरणा सदैव जागृत राहण्याचे दुष्टीने दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य लक्षात घेता. सर विश्र्वश्र्वरैया यांनी आपल्या जिवनात अभियंता म्हणून काम करतांना सलग १०२ वर्षाच्या सेवा काळात अभियंता, कुशल प्रशासक व सेवानिवृत्तीनंतर मार्गदर्शक म्हणून जे काम केले. ते नक्कीच अभियंत्याना प्रशासनात काम करतांना उपयोगी ठरणार आहे. त्याच्या विचारा ठेवा लक्षा घेवून तसेच काम केले तर कुठेही अभियंता मागे पडणार नाही. पारदर्शक व जनतेसोबत संवाद ठेवून अभियंत्यानी जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी उमाळक,व्यवहारे आदीनीही मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्राचे प्रास्तावीक अभियंता अनुप खासबागे,यांनी तर सुत्रसंचालन दिपेंद्र कोराटे,दिलीप कदम व आभार प्रदर्शन अभियंता संदीप देशमुख यांनी केले.यावेळी अभियंता संघटनेने विविध कार्यक्रमही आयोजित केले होते. कार्यक्रमाला, आनंद दासवत, प्रदीप पोकळे, आर.आर पवार, शिरीष तट्टे,डोंगरे, तायवाडे, व सर्व अभियंता उपस्थित होते.
या अभियंत्याचा गौरव
जिल्हा परिषद अभियंता संघटना व मित्रपरिवारा तर्फे के.टी उमाळकर, एस.आर लळे,भगवंत ईश्र्वरकर, हरीभाऊ लुंगे, दिलीप पाटील, भगवान खाजोने, भरत पोकळे, जी.आर. किचबंरे, शेखर भुताड या सेवा निवृत्त अभियंत्यासह पदोन्नती प्राप्त दिपेंद्र कोराटे, अजय गुप्ता, ललित सोनोने, आर.एस मांगे, मिलींद भेंडे, संजय घाणेकर, राजाभाऊ जगताप, सुरेश वानखडे, नंदा पिपळकर, राजेश लाहोेरे, आदीचा सह रक्तदान करणाºया सर्व अभियंत्याचा शाल स्मूतीचिन्ह देवून मान्यवरांचे हस्ते गौरव केला.

Web Title: The need of the hour is the need of Sir Vishwaswaraiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.