आईने किडनी दान करून वाचविले मुलाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:24 PM2019-01-18T23:24:23+5:302019-01-18T23:24:36+5:30

आईने स्वत:ची किडनी देऊन मुलाचे प्राण वाचविले. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी (विभागीय संदर्भ सेवा) रुग्णालयात ही पाचवी यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली. या शस्त्रक्रियेमुळे परतवाडा येथील सुमित राजुलाल नंदवंशी(१७) याला जीवनदान मिळाले

Mother saved her child by donating kidneys | आईने किडनी दान करून वाचविले मुलाचे प्राण

आईने किडनी दान करून वाचविले मुलाचे प्राण

Next
ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी : पाचवे प्रत्यारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आईने स्वत:ची किडनी देऊन मुलाचे प्राण वाचविले. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी (विभागीय संदर्भ सेवा) रुग्णालयात ही पाचवी यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली. या शस्त्रक्रियेमुळे परतवाडा येथील सुमित राजुलाल नंदवंशी(१७) याला जीवनदान मिळाले
परतवाडा येथील सुमितच्या किडन्या निकामी झाल्याने तो नऊ महिन्यांपासून अंथरुणाला खिळला होता. त्याला सुपर स्पेशालिटीत दाखल केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधीक्षक पदावर असलेले जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व विशेष कार्य अधिकारी डॉ.टी.बी. भिलावेकर यांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत कुटुंबीयांचे समुपदेशन केले. विविध चाचण्याअंती सुुमितची आई ममता राजूलाल नंदवंशी (३९) यांनी किडनी दान करण्यास संमती दिली. त्यानुसार शुक्रवारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.
नागपूर येथील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ संजय कोलते, भूलतज्ज्ञ निशांत बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सुपर स्पेशालिटीचे युरोसर्जन राहुल पोटोडे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ.विशाल बाहेकर, डॉ.राहुल घुले, नेफ्रोलॉजिस्ट डॉ.अविनाश चौधरी, डॉ.निखिल बडनेरकर, डॉ.विक्रम कोकाटे, डॉ. सौरभ लांडे, भूलतज्ञ राजेश कस्तुरे, डॉ. रामप्रसाद चव्हाण, डॉ. प्रणित घोनमोडे यांनी शस्त्रक्रिया केली. कायदेशीर प्रक्रियेची बाजू किडनी प्रत्यारोपण समन्वयक डॉ.सोनल चौधरी व समाजसेवा अधीक्षक नवनाथ सरवदे, सतीश बडनेरकर यांनी सांभाळली.
यवतमाळ येथील राज्य प्राधिकार समितीचे अधिष्ठाता मनीष श्रीगिरीवार, समिती अध्यक्ष स्नेहल कुलकर्णी, आरोग्य उपसंचालक डॉ. आर.एस. फारुकी, डॉ.टी.एस. वारे, यवतमाळचे सीएस टी.सी.राठोड, दिनकर पाटील या समिती सदस्यांच्या मान्यतेनंतर ही शस्त्रक्रिया पार पडली. यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. मीनल चव्हाण, प्रकाश येनकर यांचे सहकार्य लाभले. अधिसेविका माला सुरपाम, ओटी स्टाफ प्रतिभा अंबाडकर, नीता श्रीखंडे, ज्योती तायडे, मनीषा कांबळे, दुर्गा घोडिले, ज्योती काळे, रीतू बैस, आयसीयू स्टाफ आशा गडवार, अलका मोहोड आदींनी सहकार्य केले.

Web Title: Mother saved her child by donating kidneys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.