महापालिकेकडून मोबाईल टॉवर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:42 PM2019-03-13T22:42:47+5:302019-03-13T22:42:59+5:30

मध्य झोन क्रमांक २ राजापेठमधील वॉर्ड क्रमांक २२ मध्ये असलेल्या एका मोबाईल कंपनीचे टॉवर महापालिकेच्या राजापेठ मध्य झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्तांनी सील केले. ही कारवाई बुधवारी जप्ती पथकाने केली. सदर मोबाईल टॉवर कंपनीवर अडीच लाखांची थकबाकी असल्याची बाब पुढे आली आहे.

Mobile Tower Seal from Municipal Corporation | महापालिकेकडून मोबाईल टॉवर सील

महापालिकेकडून मोबाईल टॉवर सील

Next
ठळक मुद्देसहायक आयुक्तांची कारवाई : अडीच लाखांचे थकबाकी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मध्य झोन क्रमांक २ राजापेठमधील वॉर्ड क्रमांक २२ मध्ये असलेल्या एका मोबाईल कंपनीचे टॉवर महापालिकेच्या राजापेठ मध्य झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्तांनी सील केले. ही कारवाई बुधवारी जप्ती पथकाने केली. सदर मोबाईल टॉवर कंपनीवर अडीच लाखांची थकबाकी असल्याची बाब पुढे आली आहे.
मध्य झोन क्रमांक २ मधील वॉर्ड क्रमांक २२ मधील मालमत्ता क्रमांक ५३१/२ स्थित मालमत्ताधारक गीतादेवी नेमाणी यांच्या मालमत्तेवर भोगवटदार- २१ सेन्चुरी इन्फ्रा टेल लिमिटेड कंपनीचे मोबाईल टॉवर २ लाख ५२ हजार ९८६ रूपयांची थकबाकीपोटी सदर टॉवर सील करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर कारवाई ही सहायक आयुक्त व जप्ती पथकप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध मोबाईल टॉवर कंपन्यांची तारांबळ उडाली आहे.

Web Title: Mobile Tower Seal from Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.