सदाभाऊंच्या निर्देशाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:48 PM2017-11-13T22:48:35+5:302017-11-13T22:49:06+5:30

शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी अटी गुंडाळून खरेदी करा; आर्द्रता १२ च्या ऐवजी १४ टक्के असली तरी चालेल, ....

Lose the direction of Sadabhau | सदाभाऊंच्या निर्देशाला खो

सदाभाऊंच्या निर्देशाला खो

googlenewsNext
ठळक मुद्देडीएमओला सूचना नाहीत : नाफेडच्या अटी-शर्तीनुसारच होतेय सोयाबीनची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी अटी गुंडाळून खरेदी करा; आर्द्रता १२ च्या ऐवजी १४ टक्के असली तरी चालेल, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी कोल्हापूर तेथे दिले. अध्यादेशाची गरज नाही, मी सांगतोय तोच अध्यादेश, असेहीे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याद्वारे शासनानेच शेतकºयांना दिलेल्या ग्वाहीला रात्र उलटत नाही तोच जिल्ह्यात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील बाजार समित्या व नाफेडच्या खरेदी केंद्रांना भेटी देऊन शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. नाफेडच्या केंद्रावर अटी व शर्तीमुळेच खरेदी मंदावली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उत्पादनाच्या तुलनेत सोयाबीनची खरेदी नगण्य प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यंत्रणेला निर्देश दिलेत. सोयाबीनमध्ये कचरा असल्यास चाळणी मारून ते खरेदी करा, सात-बारावरील नोंदी न पाहता शेतकरी असल्याचा दाखला, आधार कार्ड, बँक खात्याची झेरॉक्स घ्या तसेच आधी चांगल्या प्रतीचे व नंतर तुय्यम प्रतीचे सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. शेतकरीहिताचे धोरण शासनाद्वारा जाहीर झाल्याने सदाभाऊंच्या या निर्देशाला राज्यस्तरावर प्रसिद्धी मिळाली. मात्र, रात्र उलटत नाही तोच जिल्ह्यासह सर्वत्र नेहमीच्याच पद्धतीने खरेदी सुरू झाली. डीएमओंशी संपर्क साधला असता, मुंबईच्या बैठकीत निर्देश मिळाले नाहीत तसेच सद्यस्थितीत शासनाचे कोणतेच निर्देश व अध्यादेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोयाबीनची आर्द्रता कमी झाल्यावर वजनदेखील कमी होणार असल्याने या घटलेल्या वजनाचा फरक कोण देणार, याविषयीचे कोणतेच दिशानिर्देश नाहीत. त्यामुळे देखील नाफेडच्या केंद्रांवर प्रचलीत पद्धतीनेच खरेदी होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात दहा केंद्रांवर नाफेडद्वारा ६८३ शेतकºयांचे १४ हजार ३५३ क्विंटल, तर व्यापाºयांनी ५ लाख ६५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तीचा भडीमार आहे, तर मोजणीचा वेग नसल्याने केंद्रांसह खासगी विक्रीत व्यापाºयांद्वारा शेतकºयांची लूट होत आहे.
नाफेड केंद्रावरची शासन खरेदी
सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून ११ केंद्रांवर ५७६ शेतकºयांकडून १२ हजार ३२४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर ४४७ क्विंटल, अमरावती १६१, अंजनगाव सुर्जी ६६०, चांदूर बाजार १८६, चांदूर रेल्वे १५६०, धामणगाव रेल्वे ६७२३, मोर्शी ६९८, नांदगाव खंडेश्वर ७८७, दर्यापूर ८४ व तिवसा १०१४ क्विंटलची खरेदी करण्यात आली, तर धारणी व वरूड तालुक्यात खरेदी निरंक आहे.
अशी आहे व्यापाºयांची खरेदी
यंदाच्या हंगामात व्यापाºयांद्वारा ५ लाख ६५ हजार १८७ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये ३,६१,२५० क्विंटल, नांदगाव खंडेश्वर १६,८४०, चांदूर रेल्वे १५,९१५, धामणगाव रेल्वे ७९,०४९, चांदूरबाजार २१,०५४, तिवसा ६५, मोर्शी २१,०३३, वरुड ७०४, दर्यापूर १३,९१५, अंजनगाव सुर्जी १४,५२३, अचलपूर १४,१०९ व धारणी तालुक्यात ६,७३० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील दहाही केंद्रांवर नाफेडचे ग्रेडर सोमवारपासून उपलब्ध झालेले आहेत. सोयाबीन खरेदीसंदर्भात कोणतेही नव्याने आदेश, अध्यादेश नाहीत. नेहमीप्रमाणे खरेदी सुरू आहे.
- रमेश पाटील
जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

Web Title: Lose the direction of Sadabhau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.