- तर मीरा ठरली असती सर्वांत कमी वयाची अवयवदाता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:16 PM2017-12-09T22:16:36+5:302017-12-09T22:18:49+5:30

मीरा अवघ्या तीन महिन्यांची गोंडस चिमुकली. कार अपघातानंतर उपचारासाठी नागपूरला आणले. ती बे्रनडेड अवस्थेत गेल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर खुद्द डॉक्टर असलेल्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. मात्र, स्वत:ला सावरत त्यांनी तिच्या अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

- It would have been the sweetest aged compound! | - तर मीरा ठरली असती सर्वांत कमी वयाची अवयवदाता!

- तर मीरा ठरली असती सर्वांत कमी वयाची अवयवदाता!

Next
ठळक मुद्देअवयवदानापूर्वीच मालवली प्राणज्योत : डॉ. सावरकर दाम्पत्याच्या तळमळीला सलाम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मीरा अवघ्या तीन महिन्यांची गोंडस चिमुकली. कार अपघातानंतर उपचारासाठी नागपूरला आणले. ती बे्रनडेड अवस्थेत गेल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर खुद्द डॉक्टर असलेल्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. मात्र, स्वत:ला सावरत त्यांनी तिच्या अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या अवयवदानातून दिल्लीतील चौघांना जीवनदान मिळणार होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता ही प्रक्रिया सुरू होणार होती. त्याच्या काही तासांपूर्वी मीराची प्राणज्योत मालवली. यावेळी मात्र तिच्या आई-वडिलांचे दु:ख आभाळाएवढे मोठे झाले.
काँग्रेसनगर रोडवरील रहिवासी वैद्यकीय व्यावसायिक उमेश सावरकर, अश्विनी सावरकर व तीन महिन्यांची मीरा हे कुटुंबीय त्यांच्या रुग्णालयापुढे कारमध्ये बसले असताना, चारचाकी वाहन धडकले. अपघातात सावरकर दाम्पत्यासह मीरा गंभीर जखमी झाली. प्रकृती गंभीर असल्यामुळे मीराला तत्काळ नागपूर हलविण्यात आले. तिला वाचविण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. डॉक्टरांनी तिला बे्रनडेड घोषित केल्यानंतर तिचे अवयवदान करण्याचा निर्णय सावरकर दाम्पत्याने घेतला. तिचे अवयवरूपाने अस्तित्व राहील, ही त्यामागील भावना. त्यानुसार त्यांनी स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने नॅशनल आॅर्गन ट्रान्सप्लांट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
पोलीस कारवाईत दिरंगाई; चालकाला अटक
डॉ. सावरकर यांच्या कारला धडक देणाऱ्या कारच्या चालकाला फे्रजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. २ डिसेंबर रोजी हा अपघात घडला होता. पवन पंजाब मापले (२४, रा. रामा साऊर) असे आरोपीचे नाव आहे. एमएच २७ बीई-५५२९ क्रमांकाचे हे वाहन पोलिसांनी जप्त केले. ती कार जयप्रकाश मतानी (रा. दस्तुरनगर) यांची आहे. पोलिसांनी कारवाईविषयी तत्परता दाखविली नसल्याचा डॉ. सावरकरांचा आरोप आहे.
प्रयत्नांची शर्थ; असाध्य झाले नाही साध्य
इतक्या कमी वयात कुणाचे अवयवदान आजपर्यंत कोठे झाले आहे का, हे ऐकिवात नाही. मात्र, ते घडवून आणण्याची जिद्द काही डॉक्टरांनी उराशी बाळगली होती. मीराच्या आई-वडिलांनी तिच्या वियोगाचे दु:ख दूर सारून त्यासाठी प्रयत्न केले. प्रामाणिक प्रयत्नांना यशाची जोड मिळेल, अशी अपेक्षा या अवयवदानासाठी धडपडणाºया सर्वांना होती. मात्र, असाध्य ते साध्य होऊ शकले नाही.

मीराचे अवयव दान करण्यासाठी सर्व यंत्रणांकडून रीतसर परवानगी घेतली. सर्व तयारी झाली होती. मात्र, अवघ्या काही तासांत सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
- डॉ. उमेश सावरकर, मीराचे वडील.

Web Title: - It would have been the sweetest aged compound!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात