२४ दिवसांपासून आयपीएस यादव फरार, आश्रय कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 10:16 PM2018-02-22T22:16:07+5:302018-02-22T22:16:21+5:30

वाळू कंत्राटदारावर दोषारोपपत्र दाखल करताना मदत करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी नांदेडच्या इतवारा उपविभागाचा सहायक पोलीस अधीक्षक जी. विजयकृष्ण यादव याच्या साथीदाराला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. याप्रकरणी यादववरही गुन्हा दाखल आहे. मात्र, तो...

IPS Yadav absconding for 24 days? | २४ दिवसांपासून आयपीएस यादव फरार, आश्रय कुणाचा?

२४ दिवसांपासून आयपीएस यादव फरार, आश्रय कुणाचा?

Next

अमरावती - वाळू कंत्राटदारावर दोषारोपपत्र दाखल करताना मदत करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी नांदेडच्या इतवारा उपविभागाचा सहायक पोलीस अधीक्षक जी. विजयकृष्ण यादव याच्या साथीदाराला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. याप्रकरणी यादववरही गुन्हा दाखल आहे. मात्र, तो २४ दिवसांनंतरही फरारच असल्याचे एसीबीकडून सांगण्यात येत आहे. 
आयपीएस यादवचा १४ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मात्र, एसीबीच्या पथकाला आयपीएस यादव गवसला नाही. लाच स्वीकारणारा मध्यस्थी सन्नीसिंग बंगुईला एक दिवसाची कोठडी सुनावल्यानंतर २ फेब्रुवारीला जामीन मंजूर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, एसीबीच्या तपास अधिकाºयांनी न्यायालयात मांडलेले प्रमुख तीन मुद्दे, ज्यामधील यादव यांनी सुरुवातीला लाच मागणाºया व्यक्तीला भेटायला आणलेली गाडी (क्र. एपी२१/व्हीडी५९९१), यादव याच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप पैशांची मागणीबाबतचे चार्टिंग व फिर्यादी यांच्याकडून याआधी घेतलेल्या एक लाख रुपये जप्त करायचे असल्यामुळे आपीएस यादव यांना अटक करणे भाग आहे. तरीसुद्धा यादव मागील काही दिवसांपासून फरार असल्यामुळे त्याला कुण्या राजकीय नेत्यांचा किंवा पोलीस विभागातील अधिकाºयांचा आश्रय तर नाही ना, असा संशय बळावला आहे. याबाबत लाचलुचपत अमरावती विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क केला असता आरोपी आयपीएस यादव याच्या फरारबाबत बोलणे न केल्यास बरे, असे सांगण्यात आले.

यादव उच्च न्यायालयात जाणार !
नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आरोपी आयपीएस यादव दाद मागणार, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Web Title: IPS Yadav absconding for 24 days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.